Muslim : मौलानाकडून विवाहितेवर ११ वर्षे अत्याचार; व्हिडीओ व्हायरल होताच नागरिकांनी चोपले

182

एका २२ वर्षीय विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या मौलानाच्या विरोधात पीडित महिलेने पोलिसांत तक्रार केली. या पीडितेवर तिच्या वयाच्या अकराव्या वर्षापासून हा मुसलमान (Muslim) मौलाना अत्याचार करत होता. यासंबंधीचा व्हिडिओ जेव्हा समोर आला तेव्हा संतप्त झालेल्या नागरिकांनी मौलानाला चोप दिला. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या मौलानाचे नाव इस्माईल करीम शेख उर्फ मौलाना कासमी असे आहे.

लातूर शहरातील गावभागातील एक 22 वर्षीय विवाहिता मागील दहा वर्षापासून शारीरिक शोषण करणाऱ्या मौलानाच्या त्रासाला कंटाळून गेली होती. या त्रासातून सुटका मिळावी यासाठी मौलानाला पुराव्यासह पकडण्यासाठी त्याचा एक व्हिडिओ करण्यात आला होता. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता समाजातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. विवाहित पीडित ही बावीस वर्षाची आहे. लातूर शहरातील गाव भागात ही विवाहिता पती, दीर आणि सासऱ्यासोबत राहते. तिचे हे दुसरे लग्न आहे. पहिले लग्न न टिकल्याने त्यांचा घटस्फोट झाला होता. आरोपी मौलना कासमीमुळे तिचा दुसरा विवाहही संकटात आला होता. या मौलानाचे लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मदरसे आहेत. याच मदरशामध्ये वयाच्या अकराव्या वर्षापासून शिक्षण घेणाऱ्या पीडितेवर या मौलानाची वाईट नजर होती. त्यावेळेपासून मुलांना सातत्याने पीडितेचे शारीरिक शोषण केले आहे. पहिले लग्न ही मौलानाने लावून दिले आणि काडीमोड ही करायला लावला होता. दुसरे लग्न ही लावण्यात ह्याच मौलानांचा पुढाकार होता.

(हेही वाचा Muslim : अहमदनगरमध्ये धर्मांध मुसलमानांचा हिंसाचार; श्री कानिफनाथ समाधी मंदिरात भजनी मंडळाला मारहाण)

सासरच्या लोकांना घेतले विश्वासात

या पीडितेचा दुसरा विवाह झाल्यानंतर मौलाना सातत्याने फोनवर संभाषण करत होता. भेटायला ये..आपण बाहेर जाऊ असे सांगून त्रास देत होता. पीडितेने सदर बाब आपल्या घरातील लोकांना सांगितली. याची माहिती कळल्यानंतर त्यांना विश्वास बसणे शक्य नव्हते. सासरा, पती आणि दीरास याची माहिती कळल्यावर त्यांना धक्काच बसला. मग सदर घटनेचा एक व्हिडिओ करण्यात आला. व्हिडिओ काही लोकांनी पाहिला. तो व्हिडिओ व्हायरल झाला. संतप्त लोकांनी मौलाना कासमी यांना धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न ही केला होता. सदर घटनेची माहिती विवेकानंद पोलिसांना कळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली. वयाची सत्तरी पार केलेला मौलाना ईस्माईल करीम शेख ऊर्फ मौलाना कासमी याचे मुस्लिम (Muslim) समाजात मोठे प्रस्थ आहे. त्याच्या देखरेखेखाली जिल्ह्यात सात मदरसे चालतात.त्याने संपूर्ण भारतच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया सारख्या ठिकाणीही धर्मप्रसारासाठी भेटी दिल्या आहेत. मोठ्या प्रमाणात येथून त्याला देणगी येत असते. त्यामुळे आर्थिक सुबत्ता त्याच्याकडे भरपूर आहे. अशा व्यक्तीच्या दुष्कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने समाजात संतप्त भावना आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.