Share Market : दिवाळीत शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांना किती झाला फायदा? वाचा सविस्तर…

मणप्पूरम फायनान्सचा शेअर १० टक्क्यांनी वाढला.

110
Share Market : दिवाळीत शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांना किती झाला फायदा? वाचा सविस्तर...
Share Market : दिवाळीत शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांना किती झाला फायदा? वाचा सविस्तर...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात तेजी झळकली. भारतीय शेअर बाजाराने (Share Market) बुधवारी, १५ नोव्हेंबरला उसळी घेतली. आजच्या ट्रे़डिंग सत्रात सेन्सेक्सने ७४२ अंकांनी वाढून ६५, ६५७.९३ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी २३१ अंकांनी वाढून १९,६७५.४५ वर बंद झाला. आजच्या सत्रात सेन्सेक्स १.१४ टक्के आणि निफ्टी १.१९ टक्क्यांनी वाढला.

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना ३.१ लाख कोटींचा फायदा झाला. यामुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३२५.२ लाख कोटींवर पोहोचले आहे. सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, विप्रो, टाटा स्टील, इन्फोसिस, टीसीएस, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, रिलायन्स, अॅक्सिस बँक, एचसीएल टेक, कोटक बँक, एचडीएफसी बँक, एनटीपीसी हे शेअर्स १ ते ३.५० टक्क्यांदरम्यान वाढले.

(हेही वाचा – Skydiver Sheetal Mahajan: भारताच्या प्रसिद्ध स्कायडायव्हर शीतल महाजन यांचा नवा विक्रम !)

मणप्पूरम फायनान्सचा शेअर १० टक्क्यांनी वाढला. एनएसईवर हा शेअर १० टक्क्यांनी वाढून १५४ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. त्यांना १५० रुपयांवर स्थिरावला. बाजारात आयटी क्षेत्रातील शेअर्स आघाडीवर होते. सेन्सेक्सवर टेक महिंद्राचा आघाडीवर होता. हा शेअर ३ टक्क्यांनी वाढून १,१७२ रुपयांवर पोहोचला. विप्रोचा शेअर २.१५ टक्क्यांनी वाढून ३८९ रुपयांवर गेला. निफ्टी आयटी सुमारे २ टक्क्यांनी वाढला. इन्फोसिसचा शेअर सुमारे १.८० टक्के आणि टीसीएसचा शेअर सुमारे १.५० टक्क्यांनी वाढला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.