Baramati : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी ‘बारामती बंद’ची हाक

धनगर समाजाचे चंद्रकांत वाघमोडे आमरण उपोषणास बसले आहेत.

72
Baramati : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी 'बारामती बंद'ची हाक
Baramati : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी 'बारामती बंद'ची हाक

बारामतीत (Baramati) धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात व्हावा या मागणीसाठी 9 नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू आहे. धनगर समाजाचे चंद्रकांत वाघमोडे आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असतानाही या आंदोलनाकडे प्रशासकीय स्तरावर गांभीर्याने घेतले जात नसल्याची तक्रार धनगर समाजाने केली आहे.

त्यामुळे धनगर आरक्षणाच्या मागणीकडे शासकीय स्तरावर दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी, १६ नोव्हेंबरला ‘बारामती बंद’ची हाक देण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदनाची प्रत पोलीस निरिक्षक व उपविभागीय पोलिस अधिका-यांना देण्यात आली आहे. हा बंद शांततेत पार पाडला जाईल, अशी ग्वाही या निवेदनात देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Ind vs NZ : विराट, श्रेयसची शतकं, भारताचं न्यूझीलंडसमोर ३९८ धावांचं आव्हान )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.