Samriddhi Highway Accident : अपघातातील मृतांची डीएनए चाचणी होणार- देवेंद्र फडणवीस

समृद्धी महामार्गावरुन अपघात (Samriddhi Highway Accident) झालेली बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती.

178
Samriddhi Highway Accident : अपघातातील मृतांची डीएनए चाचणी होणार- देवेंद्र फडणवीस

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात (Samriddhi Highway Accident) होरपळून निघालेल्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या रुगणालयाचा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे. तसेच या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

समृद्धी महामार्गाचे काम अतिशय चांगले करण्यात आले आहे. त्याठिकाणी स्मार्ट सिस्टीम लावण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यावर उपाययोजना करत आहोत. याठिकाणी अपघात (Samriddhi Highway Accident) होणार नाहीत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, बसला आग लागल्यामुळे २५ जणांचे मृतदेह जळाले आहे. त्यामुळं त्यांची ओळख पटण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मृतदेहांची डीएनए चाचणी करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासोबत फडणवीस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ते स्वतः घटनास्थळी जाणार आहेत. तिथे जाऊन आम्ही घटनेची सविस्तर माहिती घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. हा अपघात होण्याची नेमकी कारणं काय आहेत, याबाबतची माहिती घेत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

(हेही वाचा – समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रूपयांची मदत जाहीर)

समृद्धी महामार्गावरुन अपघात (Samriddhi Highway Accident) झालेली बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या बसमध्ये ३२ प्रवासी बसले होते. त्यापैकी २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.