Ashish Shelar : भाजपचा नियोजित मोर्चा रद्द : “आज आम्ही काही बोलणार नाही पण…” – आशिष शेलार

आजचा दिवस दुःखाचा आहे, आज आम्ही काही बोलणार नाही.

175
Ashish Shelar : भाजपचा नियोजित मोर्चा रद्द : "आज आम्ही काही बोलणार नाही पण..." - आशिष शेलार

भाजप आणि महायुती यांचा नियोजित “आक्रोश आंदोलन” मोर्चा रद्द करण्यात आला आहे. आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी याची माहिती दिली आहे. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात (Samriddhi Highway Accident) २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार आशिष शेलार यांनी स्वतः ट्विट करत मोर्चा रद्द झाल्याची माहिती दिली आहे. ठाकरे गटाच्या विराट मोर्चाला उत्तर देण्यासाठी शनिवार १ जुलै रोजी भाजप आणि महायुतीचा आक्रोश आंदोलन हा मोर्चा निघणार होता.

(हेही वाचा – Samriddhi Highway Accident : अपघातातील मृतांची डीएनए चाचणी होणार- देवेंद्र फडणवीस)

काय म्हणाले आमदार आशिष शेलार?

बुलढाण्यातील अत्यंत वेदना देणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दु:खाचा डोंगर कोसळेल्या कुटुंबासोबत आमच्या ही सहवेदना! स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनी सुध्दा शोकभावना व्यक्त केल्या आहेत. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घटनास्थळी पोहचत आहेत.

या संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज होणारे भाजप आणि महायुतीचे “आक्रोश आंदोलन” आज न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

आजचा दिवस दुःखाचा आहे, आज आम्ही काही बोलणार नाही, पण मुंबईकरांना लुटणाऱ्यांकडे हिशेब मात्र यापुढे ही मागतच राहू! अशा शब्दांत आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत मोर्चा रद्द झाल्याची माहिती दिली.

समृद्धी महामार्गावरुन अपघात (Samriddhi Highway Accident) झालेली बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या बसमध्ये ३२ प्रवासी बसले होते. त्यापैकी २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.