Sakinaka Police Station : आमदार दिलीप लांडेंच्या पाठपुराव्याला यश; पोलिसांना मिळणार नवी इमारत

82
साकीनाका पोलिस ठाण्याचे नवीन इमारतीचे संकेतस्थळ
Sakinaka Police Station : आमदार दिलीप लांडेंच्या पाठपुराव्याला यश; पोलिसांना मिळणार नवी इमारत

Sakinaka Police Station           मुंबई : अंधेरी-कुर्ला रोडवरील मोहिली व्हिलेज येथे साकीनाका पोलिस ठाण्याची नवी इमारत उभारण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विधान भवनातील त्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. या नव्या इमारतीत पोलिस कर्मचाऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध असतील. (Sakinaka Police Station)

(हेही वाचा – Assembly Session : वानखेडेवर टीम इंडियाचा ‘सेमीफायनल’ धमाका; पण विधिमंडळात आमदारांचा ‘तिकीट’ राडा)

साकीनाकासारख्या प्रचंड गजबजलेल्या लोकवस्तीतील या पोलिस ठाण्यावरील ताण तसेच अपुरी पडणारी सध्याच्या पोलिस ठाण्याची इमारत पाहता येथे नव्या इमारतीची गरज आहे. या पोलिस ठाण्याच्या समस्या लक्षात घेत आमदार लांडे यांनी नव्या इमारतीसाठी शासनाकडे आग्रह धरला होता. त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाण्यासाठी नगर भुमापन क्र. 832बी /2, मोहिली व्हीलेज, कुर्ला-अंधेरी रोड, सफेद पूल, साकीनाका येथील ही जागा निवडण्यात आली आहे. (Sakinaka Police Station)

(हेही वाचा – Pakistan Crisis : पाकवर उपासमारीची टांगती तलवार: समुद्री मार्ग बंद झाल्याने सरकारने नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला)

महापालिकेच्या ताब्यात असलेल्या आरक्षित भूखंडावर ही इमारत बांधली जाणार आहे. या बैठकीला आमदार दिलीप लांडे यांच्यासोबत गृह विभागाचे अपर मुख्य सचिव, नगरविकास खात्याचे अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अपर मुख्य सचिव, मुंबई महापालिका आयुक्त, मुंबईचे पोलिस आयुक्त तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Sakinaka Police Station)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.