Sachin Tendulkar Deepfake : या विकृतीने सचिन तेंडुलकरचाही घेतला बळी; स्वतःच दिले स्पष्टीकरण

Sachin Tendulkar Deepfake : एक व्हिडिओमध्ये तो 'स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट' (Skyward Aviator Quest) या गेमिंग अ‍ॅपची जाहिरात करतांना दिसत आहे. सचिनने स्वत: हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

267
Sachin Tendulkar Deepfake : या विकृतीने सचिन तेंडुलकरचाही घेतला बळी; स्वतःच दिले स्पष्टीकरण
Sachin Tendulkar Deepfake : या विकृतीने सचिन तेंडुलकरचाही घेतला बळी; स्वतःच दिले स्पष्टीकरण

डीपफेक व्हिडिओच्या (Deepfake video) प्रकरणी आणखी एक खेळाडू बळी पडला आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओबाबत खुद्द सचिन तेंडुलकरलाच (Sachin Tendulkar) पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. (Sachin Tendulkar Deepfake)

(हेही वाचा – Chief Minister Yogi Adityanath: अयोध्येत जगातील पहिल्या सेव्हन स्टार शाकाहारी हॉटेल्सचा प्रस्ताव)

एक व्हिडिओमध्ये तो ‘स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट’ (Skyward Aviator Quest) या गेमिंग अ‍ॅपची जाहिरात करतांना दिसत आहे. सचिनने स्वत: हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तसेच स्पष्टीकरण दिले आहे. सचिनने म्हटले आहे की, ”हा व्हिडिओ खोटा असून तुम्हाला फसवण्यासाठी बनवण्यात आला आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचा हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे.”

सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) या संदेशासह भारत सरकार, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांना (Maharashtra Cyber ​​Police) टॅग केले आहे.

(हेही वाचा – Kristalina Georgieva : आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे नोकऱ्यांवर होणार परिणाम; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालकांनी सांगितली टक्वेवारी)

सचिनच्या मुलीचाही उल्लेख

या बनावट व्हिडिओमध्ये सचिनच्या तोंडी त्याच्या मुलीचाही उल्लेख आहे. या व्हिडिओमध्ये सचिन म्हणत आहे की, “माझी मुलगी या वेळी एविएटर ही गेम खेळतेय, ज्याविषयी प्रत्येकजण सध्या बोलतोय. स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट अ‍ॅप खेळून दररोज एक लाख ८० हजार रुपये कमावते.”

यापूर्वी रश्मिका मंदान्नाचाही एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. सारा तेंडुलकरचाही एक डीपफेक फोटो व्हायरल झाला आहे. (Sachin Tendulkar Deepfake)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.