BJP चा आदिवासी समाजावर फोकस

देशभरात पसरलेल्या आदिवासी समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपाने भगवान बिरसा मुंडा यांची जयंती "जनजातीय गौरव दिवस" म्हणून साजरा करण्यास अलीकडेच सुरुवात केली होती.

134
BJP चा आदिवासी समाजावर फोकस
BJP चा आदिवासी समाजावर फोकस

भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) लोकसभेच्या निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) सर्व समाजाला जोडण्याकरिता व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. आदिवासी समाजानंतर आता पहाडिया समाजाकडे मोर्चा वळविला आहे. सविस्तर वृत्त असे की, देशभरात पसरलेल्या आदिवासी समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपाने (BJP) भगवान बिरसा मुंडा (Birsa Munda) यांची जयंती “जनजातीय गौरव दिवस” म्हणून साजरा करण्यास अलीकडेच सुरुवात केली होती. (BJP)

आता पहाडिया समाजाचे नायक बाबा तिलका माझी यांच्या जयंती दिनी मोठा कार्यक्रम करण्याची तयारी आहे. माझी यांची जयंती ११ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. भाजपने (BJP) येत्या ११ फेब्रुवारीला रांची येथे जनजाती समाजाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात देशभरातून पहाडिया समाजाचे लोक एकजूट होणार आहे. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामुळे पक्ष किती गंभीर आहे याची जाणीव होते. (BJP)

(हेही वाचा – India vs England Test Series : इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत के एल राहुल यष्टीरक्षण करणार नाही?)

यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मागच्या वर्षी “जनजातीय दिवस” कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रांचीला लागून खुंटी जिल्ह्यात गेले होते. भगवान बिरसा मुंडा यांचे उलिहातु या गावी हा कार्यक्रम झाला होता. पंतप्रधान (PM Narendra Modi) यांनी यात हजारो कोटी रुपयाच्या योजनाची घोषणा केली होती. भाजपा आदिवासी नेत्यांनाही सन्मान देण्याच्या योजनेवर काम करीत आहे. झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना राष्ट्रपती बनवून भाजपने आधीच आदिवासी लोकांच्या मनात आदरांचे स्थान मिळविले आहे. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.