विधानभवनात Rohit Sharmaने केलं मराठीत भाषण, म्हणाला…

96
विधान भवनात Rohit Sharmaने केलं मराठीत भाषण, म्हणाला...

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस आहे. शुक्रवारी, (५ जुलै) विधान भवनात विश्वविजेते भारतीय खेळाडू दाखल झाले. त्यामुळे ते ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले आहेत. त्यांच्यासाठी विधान भवनाच्या सभागृहात खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रोहित शर्माने (Rohit Sharma) केलेल्या भाषणामुळे चाहते हरखून गेले.

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल हे खेळाडू शुक्रवारी, विधानभवनात आले. या खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं तसंच, त्याआधी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानीही ते दाखल झाले होते. तर, दुसरीकडे राज्यातील तामपानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाऊस आहे तर काही ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी, ४ जुलै रोजी मुंबईत दाखल झाला होता. त्यांच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी मरीन ड्राईव्हवर जमली होती.

(हेही वाचा – Vidhan Bhavan Felicitation: विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार  )

रोहित शर्मा म्हणाला,
विधान भवनात रोहित शर्माने चक्क मराठीतून भाषण केलं. यावेळी तो म्हणाला की, ”सगळ्यांना माझा नमस्कार. मुख्यमंत्री खूप धन्यवाद. बरं वाटलं सर्वांना पाहून. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असा कार्यक्रम कधी झाला नाही. असा कार्यक्रम आमच्यासाठी ठेवलाय. त्यामुळे भरपूर आनंद झाला. गुरुवारी आम्ही जे पाहिलं मुंबईत ते आमच्यासाठी सर्व स्वप्नवत होतं. वर्ल्ड कप इंडियात आणण्याचं आमचं स्वप्न होतं. ११ वर्षे आम्ही थांबलो होतो.’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.