Road Accident : राष्ट्रीय महामार्ग ठरतोय अपघाताचा मार्ग; नितीन गडकरी यांची माहिती

दोन वर्षात ८.७३ लाख अपघात; ३ लाख २२ हजारांचा मृत्यू

131
Road Accident : राष्ट्रीय महामार्ग ठरतोय अपघाताचा मार्ग; नितीन गडकरी यांची माहिती
Road Accident : राष्ट्रीय महामार्ग ठरतोय अपघाताचा मार्ग; नितीन गडकरी यांची माहिती

प्रवास करण्यासाठी निघताना प्रत्येक जण फार उत्साही असतो मात्र ज्या मार्गावरून तो प्रवास करणार असतो तो किती सुरक्षित आहे की नाही, याचा विचार प्रवाशांनी आधी करायला हवा, अशी परिस्थिती राष्ट्रीय महामार्गा वरून अपघाताला बळी पडणाऱ्या आकडेवारी वरून निदर्शनास येते. (Road Accident)

राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांची संख्या आणि अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी गुरुवारी (०७ डिसेंबर) लोकसभेत दिली. यानंतरही गाड्यांचा वेग वाढविण्याची मागणी होत आहे यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. केंद्रीय भूपृष्ट आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शुक्रवारी (०८ डिसेंबर) लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांची संख्या कमी करण्यात मंत्रालयाला पाहिजे तेवढे यश आले नसल्याची खंत व्यक्त केली. (Road Accident)

मागील दोन वर्षांत महामार्गावरील अपघातांची संख्या वाढतीवर आहे. २०२१ मध्ये चार लाख १२ हजार ४३२ अपघाताची नोंद करण्यात आली होती. २०२२ मध्ये मात्र अपघातांची संख्या वाढली आहे. २०२२ मध्ये चार लाख ६१ हजार ३१२ अपघाताच्या घटना घडल्यात. अपघात कमी होण्याऐवजी त्यात १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. दुर्दैवाची बाब अशी की, २०२१ मध्ये एक लाख ५३ हजार ९७२ जणांचा मृत्यू झाला. यानंतर २०२२ मध्ये झालेल्या अपघातात एक लाख ६८ हजार ४९१ जणांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुखाची गोष्ट आहे, असेही गडकरी (Nitin Gadkari) यावेळी म्हणाले. (Road Accident)

(हेही वाचा – Veer Savarkar : वीर सावरकर यांचे विचार फूट पडणारे नव्हे; तर हिंदूंमध्ये बंधुभाव निर्माण करणारे; सात्यकी सावरकर यांचा प्रियांक खरगेंना प्रत्युत्तर)

महत्वाचा मुद्या असा की, राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची संख्या वाढत असताना लोकांकडून गाड्यांचा वेग वाढविण्याची मागणी होत आहे, यावरही गडकरी (Nitin Gadkari) यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, सध्या एक्सप्रेस महामार्गावर १०० ते १२० किलोमीटर ताशी वेगाने गाडी चालविण्याची परवानगी आहे. मात्र, वेगाची ही मर्यादा वाढवून ती १४० ते १६० किलोमीटर ताशी करण्याची मागणी केली जात आहे. सध्या परवानगी नसली तरी लोकांकडून दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेवर १४० किलोमीटर किंवा १६० किलोमीटरच्या वेगाने गाडी चालविली जात असल्याचे दिसून आले आहे, असेही गडकरी यांनी लोकसभेत सांगितले. (Road Accident)

नागरिकांना गाडी निश्चित वेगाने चालविण्याचे आवाहन करीत गडकरी (Nitin Gadkari) यांनी यावेळी अपघातामुळे ३.१४ टक्के जीडीपीचे नुकसान होत असल्याचेही सांगितले. यातही सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ६७ टक्के मृत्यू १८-४५ वयोगटातील होत आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून मंत्रालय अपघातांची संख्या कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. तरीसुध्दा अपघात आणि मृत्यूंची संख्या कमी होताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे, असेही ते म्हणाले. मात्र, गाडीचालकांनी कायद्याचे पालन करायला पाहिजे. लेनची शिस्त पाळणे, ड्रायव्हिंग लायसन्स असणे, वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलू नये, असे आवाही गडकरी यांनी यावेळी केले. (Road Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.