BIT Chawl : माझगाव ताडवाडी आणि लव्हलेनमधील बीआयटी चाळींची दुरुस्तीचे काम लवकरच

माझगांव ताडवाडी येथील बी. आय. टी. चाळ क्र. ३. ४ आणि ५ आणि माझगाव लव्हलेनमधील बीआयटी चाळ क्रमांक १ ते ३ या चाळींच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येत असून या दुरुस्तीच्या कामांसाठी कंत्राटदारांची नेमणूक महापालिकेने केली आहे.

266
BIT Chawl : माझगाव ताडवाडी आणि लव्हलेनमधील बीआयटी चाळींची दुरुस्तीचे काम लवकरच
BIT Chawl : माझगाव ताडवाडी आणि लव्हलेनमधील बीआयटी चाळींची दुरुस्तीचे काम लवकरच

माझगांव ताडवाडी येथील बी. आय. टी. चाळ क्र. ३. ४ आणि ५ आणि माझगाव लव्हलेनमधील बीआयटी चाळ क्रमांक १ ते ३ या चाळींच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येत असून या दुरुस्तीच्या कामांसाठी कंत्राटदारांची नेमणूक महापालिकेने केली आहे. त्यामुळे या कामांना प्रत्यक्षात येत्या काही दिवसांमध्येच सुरुवात केली जाणार आहे. (BIT Chawl)

महापालिका ‘ई’ विभागातील, माझगांव ताडवाडी आणि लव्हलेन मोतीशहा लेनमधील बी. आय. टी. चाळ महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या मालकी आहे. या इमारती तळ अधिक तीन मजल्यांचा असून त्या जवळपास शंभर वर्षे जुन्या आहेत. यासर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले आहे. या स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालानुसार या सर्व इमारती तथा चाळींची दुरुस्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणच्या बीआयटी चाळींचे स्ट्रक्चरल ऑडीट हे स्टॅन्शीअन डिझाईन्स प्रा. लि. यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. (BIT Chawl)

या दोन्ही ठिकाणच्या बीआयटी चाळींची दुरुस्ती करून सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याने तसेच रहिवाशांना यामुळे होणाऱ्या गैरसोयीची दखल घेऊन स्थानिक आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी महापालिकेशी पाठपुरावा करून याच्या दुरुस्तीच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार निविदा मागवून दोन्ही ठिकाणच्या बीआयटी चाळींच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. (BIT Chawl)

ताडवाडी येथील बीआयटी चाळ क्रमांक ३, ४ आणि ५ या चाळींच्या दुरुस्तीसाठी गौतम एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली असून या दुरुस्तीसाठी विविध करांसह २.९२ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. तर माझगाव शेठ मोती शाह मार्गावरील लव्हलेन बीआयटी चाळ क्रमांक १ ते ३ या इमारतींची दुरुस्तीसाठी एम. एम. कन्ट्रक्शन या कंपनीची नेमणूक करण्यात आले असून यासाठी ११.५४ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे या सर्व चाळींची दुरुस्ती एक वर्षांच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे. (BIT Chawl)

(हेही वाचा – Atul Save : राज्य शासनाचे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण – मंत्री अतुल सावे)

चाळींमध्ये अशाप्रकारे केली जाणार दुरुस्तीची कामे

पी. एम. एम., मायक्रो कॉक्रीट, इत्यादी

अंतर्गत (अंशतः) आणि बाहय सिमेंट गिलाव्याची कामे.

अंतर्गत (अंशतः) आणि बाहय रंगकाम करणे.

सामाईक शौचालयांमध्ये दरवाजे इ. बसविणे.

खिडक्यांवर पावसाळी पत्रे बसविणे.

प्लंबींगची कामे करणे.

विद्युत कामे व इतर दुरुस्ती.

छत व सामाईक शौचालयाच्या जलभेदीकरणाची कामे. (BIT Chawl)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.