Abhyudaya Bank : आरबीआयने अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ हटवले; प्रशासकाची नियुक्ती

RBI supersedes Abhyudaya Bank : बँकिंग नियमन कायदा, 1949 (सहकारी संस्थांना लागू) च्या कलम 56 अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून रिझर्व्ह बँकेने आज अभ्युदय सहकारी बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाला 12 महिन्यांच्या कालावधीसाठी हटवले आहे. 

256
Abhyudaya Bank : आरबीआयने अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ हटवले; प्रशासकाची नियुक्ती
Abhyudaya Bank : आरबीआयने अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ हटवले; प्रशासकाची नियुक्ती

आरबीआयने शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी मुंबईतील अभ्युदय सहकारी बँकेच्या (Abhyudaya Bank) संचालक मंडळाची हकालपट्टी केली. त्या ठिकाणी एसबीआयचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्यप्रकाश पाठक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “बँकिंग नियमन कायदा, 1949 (सहकारी संस्थांना लागू) च्या कलम 56 अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) आज अभ्युदय सहकारी बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाला 12 महिन्यांच्या कालावधीसाठी हटवले आहे.”

(हेही वाचा – Atul Save : राज्य शासनाचे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण : मंत्री अतुल सावे)

सल्लागारांची समितीदेखील नियुक्त

या सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणावर निम्न-मध्यमवर्गियांची खाती आहेत. बँकेवर कारवाई झाल्याने ग्राहकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकेच्या कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासकासोबतच आरबीआयकडून सल्लागारांची समितीदेखील नियुक्त करण्यात आलेली आहे.

बँकेचे व्यवहार सुरळीत रहाणार

संचालक मंडळाकडून खराब प्रशासन मानकांमुळे ही कारवाई करणे आवश्यक आसल्याचे आरबीआयने सांगितले आहे. आरबीआयकडून बॅंकेवर कोणतेही व्यावसायिक निर्बंध घातलेले नाहीत. त्यामुळे बँकेचे व्यवहार सुरळीत रहाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. (Abhyudaya Bank)

(हेही वाचा – Winter Session : नागपूरची थंडी बोचण्याआधीच परिपत्रक बोचले)

मध्यंतरी आरबीआयने बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर पूर आला होता. या अफवा इतक्या तीव्र होत्या की, आरबीआयला निवेदन जारी करून बातम्या खऱ्या नसल्याचे सांगावे लागले. (Abhyudaya Bank)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.