Mulund मधील नानेपाडा, एसएल रोड, शिव मंदिराजवळील पूल तसेच ऑक्सिजन नाल्यावरील पुलाची पुनर्बांधणी

मुलुंड पूर्व शिव मंदिराजवळ नानेपाडा नाल्यावरील पूल तसेच मुलुंड पश्चिम येथील रामगड तबेलाजवळील रस्ता येथील नानेपाडा पूल ही जुनी झाली असून ते तोडून त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

2650
BMC : पुन्हा एकदा महापालिकेत महिला अधिकाऱ्यावर अन्याय...
BMC : पुन्हा एकदा महापालिकेत महिला अधिकाऱ्यावर अन्याय...

मुलुंडमधील (Mulund) नानेपाडा नाल्यावरील विद्यमान पूल जुने झाल्याने हे पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुलाची बांधणी केली जाणार असून याबरोबरच मुलुंड पश्चिम येथील एस एल रोड आणि मुलुंड पूर्व येथील शिव मंदिराजवळील पूल तसेच बाँबे ऑक्सिजन नाल्यावरील पुलाची रुंदीकरण करून त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासर्व नाल्यावरील तसेच इतर पुलाच्या बांधकामासाठी सुमारे २१.६९कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. (Mulund)

पूर्व उपनगरातील ‘एस’ विभागातील बॉम्बे ऑक्सिजन नाला हा मोठा नाला आहे. भांडूप पूर्वेकडे जाण्यासाठी कोपरकर मार्ग हा एकमेव मार्ग आहे आणि त्याचा मुलूंड गोरेगाव लिंक रोड (GMLR) च्या जंक्शनपासून उतार आहे. या लिंक रोडपासून सुमारे २३ मीटर अंतरावर बॉम्बे ऑक्सिजन नाला पूल आहे. नाहूर पुलाच्या करण्यात येणाऱ्या प्रस्तावित रुंदीकरणामुळे हा उतार आणखी खडतर होऊन वाहनांच्या वाहतुकीला अडथळा ठरणार आहे. ही अडचण दूर करण्यासाठी सध्याच्या पुलासह रस्त्याची पातळी वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे या पुलांचे रुंदीकरण आणि पुनर्बाधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Mulund)

मुलुंड पूर्व शिव मंदिराजवळ नानेपाडा नाल्यावरील पूल तसेच मुलुंड पश्चिम येथील रामगड तबेलाजवळील रस्ता येथील नानेपाडा पूल ही जुनी झाली असून ते तोडून त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुलांची स्थिती नाजुक असल्याने तसेच पुलाचे बांधकाम जुने झाल्याने पुलावरील वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करून पुनर्बांधणी करावी असा अहवाल प्राप्त झाला होता. तसेच कोपरकर मार्ग आणि जीएमएलआरच्या जंक्शनवर बॉम्बे ऑक्सिजन नाल्यावरील पुलाचे रुंदीकरण करून त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी विविध करांसह विविध करांसह २१ कोटी ६९ लाख २२ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. या कामांसाठी आर. ई. इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Mulund)

(हेही वाचा – Ashish Shelar : …शिंग फुंकले तेव्हा नुसता बॅनर लावुन आले..!; ॲड. आशिष शेलार यांची उबाठावर टीका)

मुलुंड नानेपाडा नाल्यावरील पूल
  • पुलाची एकूण लांबी : १५.६७ मीटर
  • पुलाची एकूण रुंदी : १४ मीटर
  • नाल्यावरील पुलाची खोली : २. ८६ मीटर
  • पिअर्सची संख्या २२
  • स्पॅनची संख्या : २१ (Mulund)
मुलुंड पश्चिम एलएल रोड आणि मुलुंड पूर्व शिव मंदिराजवळील पूल
  • पुलाची एकूण लांबी : ११.०० मीटर
  • पुलाची एकूण रुंदी : १६. ४५७ मीटर
  • नाल्यावरील पुलाची खोली : २. ३५५ मीटर
  • पिअर्सची संख्या २२
  • स्पॅनची संख्या : २१ (Mulund)
भांडुप कोपरकर मार्ग आणिजीएमएलआर जंक्शनवरील ऑक्सिजन नाल्यावरील पूल
  • पुलाची एकूण लांबी : १७.१० मीटर
  • पुलाची एकूण रुंदी : २५. १२ मीटर
  • नाल्यावरील पुलाची खोली : ३.९१० मीटर
  • पिअर्सची संख्या २३
  • स्पॅनची संख्या : २२ (Mulund)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.