Realme GT 5 Pro : रियलमी जीटी५ प्रो फोनच्या लाँचपूर्वी फोनच्या कॅमेराने टिपलेले फोटो लीक

रियलमी जीटी५ प्रो हा फोन चीनमध्ये ७ डिसेंबरला लाँच होतोय आणि त्यापूर्वी या फोनमधील कॅमेराने टिपलेले फोटो व्हायरल झाले आहेत. अर्थातच, कॅमेरा या फोनमधील एक वैशिष्ट्यपूर्ण घटक असणार आहे. 

895
Realme GT 5 Pro : रियलमी जीटी५ प्रो फोनच्या लाँचपूर्वी फोनच्या कॅमेराने टिपलेले फोटो लीक
Realme GT 5 Pro : रियलमी जीटी५ प्रो फोनच्या लाँचपूर्वी फोनच्या कॅमेराने टिपलेले फोटो लीक
  • ऋजुता लुकतुके

रियलमी जीटी५ प्रो हा फोन चीनमध्ये ७ डिसेंबरला लाँच होतोय आणि त्यापूर्वी या फोनमधील कॅमेराने टिपलेले फोटो व्हायरल झाले आहेत. अर्थातच, कॅमेरा या फोनमधील एक वैशिष्ट्यपूर्ण घटक असणार आहे. (Realme GT 5 Pro)

स्मार्टफोन कंपनी रियलमी आपला नवीन फोन जीटी ५ प्रो लाँच करण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीला हा फोन फक्त चीनमध्ये आणला जाणार आहे आणि हळू हळू भारतीय बाजारपेठ आणि इतर आशियाई तसंच युरोपीय बाजारपेठेत फोनची विक्री केली जाईल. चीनमधील अधिकृत लाँचपूर्वी कंपनीने या मोबाईलमधील कॅमेरा आणि तंत्रज्ञान याविषयी बनवलेले व्हिडिओ लीक झाले आहेत. (Realme GT 5 Pro)

आणि त्यावरून या फोनची कल्पना आपल्याला येते. फोनमधील मुख्य कॅमेरा सोनी लिटिया सेन्सरने युक्त आहे. तर टेलिफोटो कॅमेरात कमी प्रकाशातही स्पष्ट फोटो निघेल असा आयएमएक्स पेरीस्कोप आहे. खासकरून पोर्ट्रेट फोटोंसाठी हा कॅमेरा उत्तम मानला जात आहे. (Realme GT 5 Pro)

 

View this post on Instagram

 

A post shared by techbyte (@mtechbyte)

(हेही वाचा – Maharashtra Assembly winter Session : अधिवेशनाच्या काळात सरकारच्या विरोधात ‘मोर्चे’ बांधणी)

१२०एक्स इतकी झूम केल्यानंतरही कॅमेरातील झूम लेन्स स्पष्ट फोटो काढू शकते. चीनमधील चित्रपटनिर्माते लु चुआन यांनी मोबाईल फोनमधून काढलेले काही फोटो प्रसिद्ध केले आहेत आणि त्यातून या कॅमेराची गुणवत्ता कळते. (Realme GT 5 Pro)

रियलमी जीटी ५ प्रो कॅमेरात ६.७८ इंचांचा एमोल्ड डिस्प्ले देण्यात आलाय आणि त्याची प्रखरता ४,५०० नीट्स इतकी आहे. फोनची चिप क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ प्रकारची आहे. मुख्य कॅमेरा तसंच टेलिफोटो सेन्सर कॅमेरा ५० मेगापिक्सल क्षमतेचे आहेत. तर अल्ट्रावाईड लेन्स असलेला कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सलचा आहे. (Realme GT 5 Pro)

फोनमधील रॅम २४ जीबींची आहे. तर स्टोरेज एक टेराबाईट्स पर्यंत वाढवता येतं. बॅटरीची क्षमता ५,४०० एमएएच इतकी आहे. (Realme GT 5 Pro)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.