रत्नागिरी : वंदे भारत एक्स्प्रेसच्या पहिल्याच फेरीतून रेल्वेला ६.४८ लाखांचे उत्पन्न

दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ जून रोजी झालेल्या पहिल्या फेरीला प्रवाशांकडून उत्साही प्रतिसाद लाभला.

138
रत्नागिरी : वंदे भारत एक्स्प्रेसच्या पहिल्याच फेरीतून रेल्वेला ६.४८ लाखांचे उत्पन्न

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. उद्घाटन फेरीनंतर झालेल्या पहिल्याच नियमित फेरीतून मध्य रेल्वेला सहा लाख ४८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ जून रोजी झालेल्या पहिल्या फेरीला प्रवाशांकडून उत्साही प्रतिसाद लाभला. एकूण ५३० आसनांपैकी ४७७ आसनांचे म्हणजे ९० टक्के आरक्षण पहिल्या दिवशी झाले. पहिल्याच दिवशी लाभलेला हा प्रतिसाद रेल्वेसाठी उत्साहवर्धक ठरला आहे.

(हेही वाचा – कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवणाऱ्या तरुणाचे देवेंद्र फडणवीसांनी केले कौतुक)

गणेशोत्सवात मुंबईहून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येत असल्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचे आरक्षण खुले होताच गणेशोत्सव कालावधीतील १५ ते २० सप्टेंबर या कालावधीसाठी कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसकरिता तब्बल ११० टक्के आगाऊ आरक्षण झाले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.