राज्यासाठी रेल्वेकडून २१ बोगींचे विलगीकरण कक्षात रुपांतर!

दिवसागणिक रुग्ण संख्या वाढत आहे. त्यांच्यावर उपचार कसे करायचे हा प्रश्न राज्याच्या आरोग्य खात्याला पडला आहे. त्यावर पर्याय म्हणून राज्य सरकारने रेल्वेकडे मदत मागितली. 

80

राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे रुग्णालयांतील खाटा आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत. रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी जागा नाही, त्यामुळे रुग्णांची ससेहोलपट होऊ लागली आहे. त्यावर आता उपाय म्हणून रेल्वेने राज्य शासनासाठी रेल्वेच्या बोगींचे विलगीकरण कक्षात रूपांतर केले आहे.

राज्य सरकारने रेल्वेकडे मागितलेली मदत!

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. शहरांसह ग्रामीण भागातही कोरोनाने कहर केला आहे. दिवसागणिक रुग्ण संख्या वाढत आहे. त्यांच्यावर उपचार कसे करायचे हा प्रश्न राज्याच्या आरोग्य खात्याला पडला आहे. त्यावर पर्याय म्हणून राज्य सरकारने रेल्वेकडे मदत मागितली.

(हेही वाचा : आता रुग्णालयातून थेट हॉटेलमध्ये व्हावे लागणार दाखल! मुंबई महापालिकेचा निर्णय)

बोगी पाठवल्या नंदुरबारला!

सध्या या सर्व बोगी नंदुरबार जिल्ह्यात पाठवल्या आहेत. या ठिकणी रुग्ण संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. त्या तुलनेत आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. म्हणून राज्य सरकारने येथील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी हा उपाय शोधून काढला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मागील वर्षीही असा प्रक्रारे रेल्वेने बोगींचे विलगीकरण कक्षात रूपांतर केले होते.

New Project 4 7

आवश्यकता पडल्यास आणखी बोगी तयार करणार!

त्याप्रमाणे पश्चिम रेल्वेने राज्य सरकारच्या विनंतीला मान देऊन २१ बोगीचे विलगीकरण कक्षात रूपांतर केले आहे. त्यातील १६ बोगी ह्या शयन कक्षाच्या आहेत, असे पश्चिम रेल्वेने कळवले आहे. यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. अशा प्रकारे गरज पडल्यास रेल्वे आणखी बोगी विलगीकरण कक्षात रूपांतर करणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला याचा फायदा होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.