-
डोंबिवली, प्रतिनिधी
डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील रस्त्याच्या कडेला असलेल्या केडीएमटी बस स्टॉपचा भाग खिळखिळा होऊन अखेर गुरुवारी रस्त्यावर आडवा झाला. प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या या स्टॉपचे रेलिंग वेगळे झाल्याने ते उचलण्यासाठी संध्याकाळपर्यंत परिवहन विभागातील कुणीही फरकले नव्हते. स्टील वापरुन बसविण्यात आलेल्या या स्टॉपची अशी अवस्था समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. (Dombivli)
(हेही वाचा – Dombivli News : डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणे पडले महागात; नेमकं काय घडलं ?)
एमआयडीसीच्या निवासी विभागातील कावेरी चौकात असलेल्या ऍक्सिस बँक जवळ केडीएमटी बस स्टॉप आहे. बाजी प्रभू चौक ते निवासी विभाग या मार्गावर धावणाऱ्या बसेस सदर स्टॉपवर थांबतात. या स्टॉपचे समोरील रेलिंग रस्त्यावर आडवे पडले. दिवसभर हे रेलिंग तसेच पडून होते. गेल्या काही दिवसांपासून हे रेलिंग हालत होते. गुरूवारी सकाळी लाद्या उखडून ते कोसळले. काही प्रवाशांनी बसच्या वाहक आणि चालकांना याची माहिती दिली. बस स्टॉपमधील बसण्याचे समोरील बाजूकडील संरक्षक स्टीलचे रेलिंग दिवसभर तसाच पडून होते. स्टीलचा वापर करुन सदर स्टॉप बांधण्यात आला आहे. स्टॉपसाठी वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (Dombivli)
(हेही वाचा – Bihar Election मध्ये किती उमेदवार आहेत करोडपती?)
या भागातील दक्ष रहिवासी राजू नलावडे यांनी चिंता व्यक्त केली. हेच रेलिंग एखाद्या प्रवासी वा पादचाऱ्यावर कोसळले असते तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित करत राजू नलावडे यांनी या घटनेची नोंद घेऊन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने तांत्रिक चौकशी करावी, याकडेही नलावडे यांनी लक्ष वेधले आहे. तर या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी परिवहन विभागाचा कुणीही अधिकारी उपलब्ध होऊ शकला नाही. (Dombivli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

