Radheshyam Mopalwar यांनी कमावली 3 हजार कोटींची माया; रोहित पवारांचा आरोप

मोपलवार (Radheshyam Mopalwar) निवृत्त झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या वॉररुमचे प्रमुख बनवले, असे रोहित पवार म्हणाले.

132

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. मोपलवार यांनी आपल्या 26 वर्षांच्या काळात 3 हजार कोटींची माया जमवली असून, त्यांनी याबाबतीत उद्योगपती अदानी व अंबानींनाही मागे टाकले आहे, असा आरोप केला.

रोहित पवार यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar) यांच्या कथित काळ्या कमाईचा मुद्दा मांडला. त्यांनी यासंबंधीचे ठोस दस्तावेज आपल्याकडे असल्याचा दावा केला. राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar) आजघडीला देशातील श्रीमंत सरकारी अधिकारी म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पण 2018 मध्ये तत्कालीन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी त्यांच्यावर तात्पुरती कारवाई केली. त्यानंतर त्यांच्याच खांद्यावर मोठी जबाबदारी दिली. विशेषतः मोपलवार (Radheshyam Mopalwar) निवृत्त झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या वॉररुमचे प्रमुख बनवले, असे रोहित पवार म्हणाले.

(हेही वाचा अंबानींच्या संगीत सोहळ्यात Tejas Thackeray यांचा डान्स; भाजप म्हणते, कधी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत थिरकले नाहीत…)

समृद्धी महामार्गाचे 4 महिन्यांत दुसऱ्यांदा टेंडर काढण्यात आले. त्यात वाढीसाठी मंजुरी देण्यात आली. तेव्हा हे टेंडर 55 हजार कोटीवर गेले. त्यामुळे समृद्धी सामान्य माणसांची झाली की अधिकाऱ्यांची हे स्पष्ट होते. समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्रमांक 11 चे काम सरकारने गायत्री प्रोजेक्टला दिले. हे टेंडर 1900 कोटींचे होते. पण या कंपनीने 2021 मध्ये आपल्याला हे काम जमणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर हेच काम हुजूर मल्टी प्रोजेक्टला देण्यात आले. ही हुजूर मल्टी प्रोजेक्ट कंपनी कुणाची? याच्या खोलात जाण्याची गरज आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

दोन बायकांकडे 450 कोटींची संपत्ती

मोपलवार (Radheshyam Mopalwar) यांच्या एका बायकोकडे 150 कोटी, तर दुसऱ्या बायकोकडे 300 कोटींची संपत्ती आहे. एवढेच नाही तर त्यांच्या पहिल्या मुलीकडे 500 कोटी, दुसऱ्या मुलीकडे 350 कोटी व त्यांचा भाऊ सदानंद मोपलवार यांच्याकडे 200 कोटींची संपत्ती आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.