Israel-Palestine Conflict : मोसादचे सुरक्षाकवच भेदून इस्रायलवर हल्ला करणाऱ्या ‘हमास’चा उद्देश काय आहे ?

124
Israel-Palestine Conflict : मोसादचे सुरक्षाकवच भेदून इस्रायलवर हल्ला करणाऱ्या ‘हमास’चा उद्देश काय आहे ?
Israel-Palestine Conflict : मोसादचे सुरक्षाकवच भेदून इस्रायलवर हल्ला करणाऱ्या ‘हमास’चा उद्देश काय आहे ?

पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने ७ ऑक्टोबर या दिवशी गाझा पट्टीवरून इस्रायलवर अचानक भीषण हल्ला केला आहे. (Israel-Palestine Conflict) या हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला असून युद्धाला सुरुवात झाली आहे. इस्रायलसारख्या देशावर प्रचंड ताकदीने हल्ला करणारी ‘हमास’ संघटना नेमकी काय आहे ? तिचा उद्देश काय आहे ?

(हेही वाचा – State Government : अखेर प्रशासनाला जाग आली; नांदेड, छत्रपती संभाजीनगरसह सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांत केला मोठा बदल)

शियापंथीय इराणचा पाठिंबा 

1948 मध्ये इस्रायल हा स्वतंत्र देश म्हणून स्थापन झाल्यानंतरही पॅलेस्टाईनशी त्यांचा संघर्ष प्रत्येक स्तरावर सुरूच होता. त्या वेळी इस्रायल राजकीय पातळीवर पॅलेस्टाईनसमोर कमकुवत होत असल्याचे इस्रायलला वाटले. तेव्हा 1970 च्या दशकात  इस्रायलने मध्यम पॅलेस्टिनी नेत्यांच्या विरोधात कट्टरवादी पॅलेस्टिनी संघटना तयार केली. त्याला ‘हमास’ (हरकत अल-मुकावामा अल-इस्लामिया)असे नाव देण्यात आले.  हरकत अल-मुकावामा अल-इस्लामिया ही एक धार्मिक संघटना आहे. पॅलेस्टिनी सुन्नी मुस्लिमांची ही एक सशस्त्र आणि कुख्यात संघटना आहे. इस्त्रायल शासनाला हटवून तेथे इस्लामी शासन निर्माण करणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. हमासची औपचारिक स्थापना 1987 मध्ये झाल्याचे मानले जाते. हमास ही पॅलेस्टाईनमधील इस्लामिक चळवळ आहे. १९८७ साली पहिल्या पॅलेस्टिनी इंतिफादा (उठाव) दरम्यान या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेला शियापंथीय इराणचा पाठिंबा आहे. हमास ही संघटना १९२० च्या दशकात इजिप्तमध्ये स्थापन झालेल्या मुस्लीम ब्रदरहूडच्या इस्लामी विचारसरणीला मानते. २००७ पासून हमासने गाझा पट्टीवर नियंत्रण मिळवले आहे. पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या नेतृत्वाखालील फतह चळवळीशी एकनिष्ठ असलेल्या सैन्याशी गृहयुद्ध केल्यानंतर गाझा पट्टीवर हमासने वर्चस्व स्थापन केले. २००६ मध्ये पार पडलेल्या पॅलेस्टिनी संसदीय निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर हमासने गाझा पट्टी ताब्यात घेतली आहे. (Israel-Palestine Conflict)

‘ओस्लो शांतता करारा’ला हिंसक विरोध

हमास आणि इस्रायलमध्ये अनेकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. यामध्ये बऱ्याच वेळा हमासने गाझामधून इस्रायलवर रॉकेट हल्ले केले, तर इस्रायली सैन्यांनी हवाई हल्ले करत गाझावर बॉम्बफेक केली. वास्तविक गाझा पट्टी हा इस्रायलचा प्रदेश आहे. हमासने गाझा पट्टीला इस्रायलचे राज्य म्हणून मान्यता देण्यास विरोध केला आहे. १९९० च्या दशकात इस्रायल आणि पीएलओने (Palestine Liberation Organization) केलेल्या ‘ओस्लो शांतता करारा’ला हमासने हिंसक विरोध केला होता.

दहशतवादी संघटना म्हणून घोषित

इज्ज अल-दीन अल-कासम ब्रिगेड ही हमासची सशस्त्र संघटना आहे. या संघटनेद्वारे बंदूकधारी लोक आणि आत्मघाती बॉम्बर्स इस्रायलमध्ये पाठवले जातात. यामुळे इस्रायल, युनायटेड स्टेट्स, युरोपियन युनियन, कॅनडा, इजिप्त आणि जपानने हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. गाझा हा हमासचा बालेकिल्ला आहे. मात्र पॅलेस्टाईनमधील इतरही काही प्रदेशात हमासचे समर्थक आहेत. कतारसह मध्य पूर्वेतील देशांमध्येही हमासचे समर्थक पसरलेले आहेत. (Israel-Palestine Conflict)

शिया मुसलमानांकडून शस्त्रे आणि अर्थपुरवठा

हमासला तुर्की आणि कतारकडून निधी मिळतो. हमासचा नेता खालेद मेशाल याने कतारमध्ये कार्यालय उघडले. इराण हमासला शस्त्रे आणि पैसाही पुरवतो. इराण हा शिया देश आहे, तर अरब जग सुन्नी आहे.

हमासमध्ये सुमारे 27 हजार आतंकवादी 

‘हमासमध्ये जवळपास 27 हजार आतंकवादी आहेत. हे 6 प्रादेशिक ब्रिगेडमध्ये विभागले गेले आहेत. यात 25 बटालियन आणि 106 कंपन्या आहेत. त्यांचे सेनापती बदलत राहतात. हमासला ४ विंग आहेत. इस अद-दीन अल कासिम हे लष्करी शाखेचे प्रमुख आहेत. राजकीय विभागाची कमान इस्माईल हानिया यांच्या हातात आहे. या विंगमध्ये मुसा अबू मारझूक दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरा नेता खालिद मशाल आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींसाठी ते मुस्लिम ब्रदरहूडवर अवलंबून आहे. एक सामाजिक शाखा देखील आहे.

आता हमास इस्रायलला त्रास देऊ शकला आहे. त्याचे सदस्य सामान्य लोकांच्या गर्दीत सामील होतात आणि इस्रायली सैनिकांवर हल्ला करतात. इस्रायलच्या सत्तेमुळे आता फारशी मदत मिळत नाही. प्रत्येक चकमकीत हमासचे नुकसान होते, हा इतिहास आहे. (Israel-Palestine Conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.