Pune: अनधिकृत बार-हॉटेलवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

96
Pune: अनधिकृत बार-हॉटेलवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एका बारमध्ये अल्पवयीन मुलांनी ड्रग्जचं सेवन केलं. त्यानंतर झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेनंतर आता शहरातील अशा स्वरुपाच्या अनधिकृत आणि अतिक्रमण केलेल्या हॉटेल्स आणि बारवर पुणे (Pune) महापालिकेकडून धडक कारवाई सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी अनधिकृत हॉटेल्स थेट उद्धवस्त करण्याचे आदेश दिल्यानं बुधवारी, (२६ जून) पुण्यातील सूस रोड आणि बाणेर भागात मोठी करवाई करण्यात आली. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीनं ही कारवाई केली जात आहे. यामध्ये सूस रस्ता, बाणेर इथं ज्या हॉटेल्सनं रस्त्याच्या बाजूला अतिरिक्त बांधकाम करून अतिक्रमण केलं आहे. त्या हॉटेल्सवर ही कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान पोलिसांचा फौजफाटादेखील तैनात करण्यात आला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.