ST Employees Strike: राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे 11सप्टेंबरपासून आंदोलन

का घेतला आंदोलनाचा निर्णय...वाचा सविस्तर

85
ST Employees Strike: राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे 11सप्टेंबरपासून आंदोलन
ST Employees Strike: राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे 11सप्टेंबरपासून आंदोलन

राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी 2021 साली 54 दिवस संप केला होता. त्यानंतर संप मिटला आणि एसटी सुरळीत सुरु झाली होती, मात्र आता पुन्हा एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलन पुकारले आहे.

सोमवारपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेकडून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार,11 सप्टेंबरपासून मुंबई येथील आझाद मैदानावर कर्मचारी उपोषण करणार आहेत.सोमवारपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – Rain Update: कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर आज ‘येलो अलर्ट’)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपूर्वीच भेट दिली. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात 4 टक्के वाढ केली. शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 34 टक्क्यांवरुन 38 टक्क्यांवर गेला आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यामुळे राज्य सरकारवर 9 कोटींचा बोजा पडणार आहे. शासनाच्या या निर्णयाचा लाभ सुमारे 90 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे.

आंदोलनाचा निर्णय
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता दिला जातो. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनाही 38 टक्के महागाई भत्ता देण्याची मागणी मान्य करण्यात आली. मंत्रिमंडळासमोर आलेल्या या प्रस्तावावर एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना होत असताना इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.