-
प्रतिनिधी
“राज्यातील शेतीला आधुनिकतेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद यामुळेच विभागाला १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे,” असे मत कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांमध्ये कृषी विभागाने ६६.१५ टक्के गुणांसह ठसा उमटवला. भारतीय गुणवत्ता परिषदेकडून झालेल्या मूल्यमापनात हा विभाग तिसऱ्या क्रमांकावर आला. हा क्रमांक मिळवताना विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर दिला असून, त्यात शेतकरी आयडी (AgriStack) उपक्रम विशेष महत्त्वाचा आहे. याअंतर्गत राज्यातील ९२ लाख शेतकऱ्यांचे अद्ययावत डेटाबेस तयार झाले असून, शासकीय योजनांचा लाभ एका ओळखीवर देण्याची व्यवस्था उभी राहिली आहे.
(हेही वाचा – पाकिस्तान्यांशी ‘गोतावळा’ वाढवून भारतात राहणाऱ्या मुसलमान महिलांचा Farooq Abdullah यांना वाटतोय कळवळा; म्हणाले… )
कोकाटे (Manikrao Kokate) म्हणाले की, “पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विभागीय संवाद दौरे घेतले. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रत्यक्ष ऐकून तत्काळ उपाययोजना सुरू केल्या.” पुण्यात कृषी अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करून, निविष्ठा कंपन्यांसह गुणवत्ता आणि बाजार उपलब्धतेवर चर्चा झाली. एक खिडकी सेवा, शेती यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, सूक्ष्म सिंचन, जमिनीच्या आरोग्य पत्रिका यांसारख्या योजनांच्या अंमलबजावणीत कृषी विभाग आघाडीवर असून, या सर्व सेवा डिजिटल माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ही कामगिरी ही केवळ प्रशासकीय सुधारणा नसून, राज्यातील कृषी धोरणांच्या दिशेने एक राजकीय आणि धोरणात्मक पुढाकार असल्याचेच दिसून येते. तंत्रज्ञान, संवाद आणि पारदर्शक कारभार ही कृषी विभागाची तीन प्रमुख सूत्रे ठरली असून, त्यातूनच पुढील काळात शाश्वत शेतीच्या दिशेने राज्याला पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही पार पाडणार असल्याचा निर्धार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community