Sea link Bridge: देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, प्रवाशांसाठी अतिजलद प्रवासाचा मार्ग खुला

या पुलाला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक असेही म्हणतात.

209
Sea link Bridge: देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, प्रवाशांसाठी अतिजलद प्रवासाचा मार्ग खुला
Sea link Bridge: देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, प्रवाशांसाठी अतिजलद प्रवासाचा मार्ग खुला

रायगड, ठाणे, मुंबई एक्स्प्रेस वेवरून मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिजलद प्रवासाचा मार्ग आता खुला होणार आहे; कारण देशातील सर्वात मोठ्या सी-लिंक पूल (Sea link Bridge) प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ डिसेंबर रोजी होणार आहे.

देशातील सर्वात मोठा सागरी पूल ज्याला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक असेही म्हणतात. हा सागरी पूल असून मुंबईला नवी मुंबईशी जोडला आहे. या पुलाची लांबी २१.८ कि.मी. आहे. त्याचे अधिकृत नाव श्री अटलबिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक, असे ठेवण्यात आले आहे. सेंट्रल मुंबईतील शिवरीहून नवी मुंबईतील शिवाजीनगरला या पुलावरून अवघ्या २० मिनिटांत पोहोचता येणार आहे. पूर्वी हे अंतर कापण्यासाठी दीड तास लागत होता.

(हेही वाचा – Mhada : म्हाडाच्या जमिनींची आणि इमारतींची कुंडली जाणून घेता येणार एका ‘क्लिक’वर)

एमटीएचएल ब्रिज मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच जेएनपीटी बंदर यांना उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.