Mhada : म्हाडाच्या जमिनींची आणि इमारतींची कुंडली जाणून घेता येणार एका ‘क्लिक’वर

120

म्हाडाच्या मुंबईतील तसेच राज्यातील विविध विभागीय घटकांच्या अखत्यारीतील भूखंडांचे जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. तसेच त्या जमिनीवर सद्यस्थितीत उभे असलेले स्ट्रक्चर यांचे छायाचित्र देखील काढण्यात आले असून त्या जागांचे स्थळ अचूक निर्देशित करण्याकरिता उपग्रहावरून प्राप्त केलेल्या छायाचित्रांशी समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर म्हाडाचे जमीन, व्यवस्थापन, वास्तुविशारद आणि पुनर्विकास विभाग यांच्या कार्यालयाशी संबंधित कामकाजाचे प्रत्येकी स्वतंत्र अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. अशा प्रकारे म्हाडाच्या गृहनिर्मिती, पुनर्विकास आणि जमिनी यांबाबाबत सर्व माहिती एकाच संगणकीय व्यासपीठावर उपलब्ध होणार आहे.

म्हाडा मुख्यालयात संगणकीय विभागाद्वारे आयोजित विशेष बैठकीत म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी यांनी म्हाडाच्या जमिनीची व मालमत्तेच्या व्यवस्थापनाकरिता तयार करण्यात येत असलेल्या Asset and inventory Managment या संगणकीय प्रणालीच्या कार्याचा आढावा घेतला.

नवीन वर्षाच्या सुरुवातीस ही प्रणाली कार्यान्वित

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) जमिनींच्या सर्वेक्षण , व्यवस्थापन, स्वमालकीच्या जमिनींची सद्यस्थिती, जमिनीवरील संभाव्य विकास, भूखंडांवर झालेले अतिक्रमण, आरक्षण निहाय रिक्त भूखंडांची उपलब्धता आदींबाबत माहिती देणारी जीआयएस (Geographical Information System)वर आधारित Asset and inventory Managment प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात आले असून नवीन वर्षाच्या सुरवातीस ही प्रणाली कार्यान्वित करण्याचे आदेश गुरुवारी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

(हेही वाचा Urban Naxal : राजकीय पक्षांमध्‍ये शहरी नक्षलवाद्यांची घुसखोरी अराजकतेची चाहूल)

जमिनींचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करणे शक्य

जयस्वाल यांनी पुढे अशी माहिती दिली की, जीआयएस (Geographical Information System)वर आधारित Asset and inventory Managment system म्हणजे म्हाडाच्या भविष्यातील गृहनिर्मिती व भूखंड व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये वरदान ठरणार आहेत. तसेच या संगणकीय प्रणालींच्या माध्यमातून म्हाडाला स्वमालकीच्या जमिनींची सद्यस्थिती, जमिनीवरील संभाव्य विकास, भूखंडांवर झालेले अतिक्रमण, आरक्षणनिहाय रिक्त भूखंडांची उपलब्धता याबाबत माहिती एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे या जमिनींचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करणे शक्य होणार आहे.

मॅपिंगच्या माध्यमातून सर्वेक्षण, मोजणी आणि नकाशेही तयार

या आज्ञावलींचे कार्यक्षेत्र विस्तारित करून गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाबाबत माहिती जसे विकास नियंत्रण नियमावली 33(5,) 33(7) आणि 33(9)अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांची सुरूवातीपासून ते सद्यस्थितीपर्यंतची माहिती समाविष्ट करण्यात यावी, असेही निर्देश जयस्वाल यांनी दिले. जीआयएस (Geographical Information System)वर आधारित Asset and inventory Managment system मध्ये म्हाडाच्या मुंबईसह राज्यातील विविध गृहनिर्माण मंडळांच्या अखत्यारीतील जमिनींची जीआयएस (Geographical Information System)मॅपिंगच्या माध्यमातून सर्वेक्षण आणि मोजणी करण्यात आली व त्यांचे नकाशेही तयार करण्यात आले.

विविध अभिलेखांचे एकत्रीकरण करण्यात येणार

म्हाडाच्या मुंबईतील व राज्यातील विविध विभागीय घटकांच्या अखत्यारीतील भूखंडांचे जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. तसेच त्या जमिनीवर सद्यस्थितीत उभे असलेले स्ट्रक्चर यांचे छायाचित्र देखील काढण्यात आले असून त्या जागांचे स्थळ अचूक निर्देशित करण्याकरिता उपग्रहावरून प्राप्त केलेल्या छायाचित्रांशी समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर म्हाडाचे जमीन, व्यवस्थापन, वास्तुविशारद आणि पुनर्विकास विभाग यांच्या कार्यालयाशी संबंधित कामकाजाचे प्रत्येकी स्वतंत्र अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. अशा प्रकारे म्हाडाच्या गृहनिर्मिती, पुनर्विकास आणि जमिनी यांबाबाबत सर्व माहिती एकाच संगणकीय व्यासपीठावर उपलब्ध होणार आहे. या नूतन प्रणालीमध्ये राज्यातील म्हाडाच्या जमिनीशी संबंधित विविध अभिलेखांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.

संगणकीय प्रणालींचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांनाही…

सर्वेक्षणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे म्हाडाच्या मुंबईसह राज्यातील विभागीय मंडळांच्या अखत्यारीतील जमिनींचे प्रचलित कायदे व नियमावलींच्या वापराबाबतचे नियोजन तसेच सदर भूखंडांवर आर्थिक व बांधकाम योग्य क्षमता यांबाबत माहिती दर्शविण्यात येणार आहे. ज्यामुळे कामकाजाच्या विविध टप्प्यांवर या माहितीचा उपयोग करता येणार आहे. म्हाडा अधिकार्‍यांव्यतिरिक्त या संगणकीय प्रणालींचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांनाही करता येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.