Price Hike: व्हेज थाली महागली तर नॉनव्हेज थाली स्वस्त!

108
Price Hike: व्हेज थाली महागली तर नॉनव्हेज थाली स्वस्त!
Price Hike: व्हेज थाली महागली तर नॉनव्हेज थाली स्वस्त!

उष्णता वाढल्याने भाज्या, फळं आणि डाळी महागल्या (Price Hike) आहेत. पाऊस पडेपर्यंत म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत हीच स्थिती राहणार असल्याच सांगितलं आहे. कांद्या पाठोपाठ आता टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाज्यांच्या दरात 27.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून शाकाहारी थाळी देखील महागली (Price Hike) आहे. शाकाहारी थाळीतील कांदा (Onion), बटाटा आणि टोमॅटोच्या () दरात वाढ झाल्यामुळे मे महिन्यात ही थाळी महागली आहे. असं असताना दुसरीकडे मात्र बॉयलरच्या दरात घट झाली आहे यामुळे मांसाहारी थाळी स्वस्त झाली आहे. (Price Hike)

(हेही वाचा –Lexus UX : मर्सिडिजला टक्कर देणारी लेक्सस कंपनीची ही हायब्रीड एसयुव्ही पाहिलीत का? )

या महिन्यादरम्यान टोमॅटोच्या किंमतीत 39 टक्के, बटाट्याच्या किंमतीत 41 टक्के आणि कांद्याच्या किमतीत 43 टक्के वाढ झाल्यामुळे शाकाहारी थाळीच्या किंमतीत एकूण वाढ झाल्याचे (Price Hike) अहवालाने नमूद केले आहे. बटाट्याचा दर महागल्याचं कारण पश्चिम बंगालमधून येणार अवाक कमी झाली आहे. तसेच रब्बी हंगामातील लागवड कमी झाल्यामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे. तांदूळ आणि डाळींच्या किंमतीतही वाढ झाली आहे. ही वाढ अनुक्रमे 13 टक्के आणि 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Price Hike)

(हेही वाचा –Raj Thackeray : कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरेंची माघार!)

मांसाहारी थाळीतील अनेक घटक शाकाहारी थाळीसारखेच असतात, मात्र डाळीऐवजी चिकनचा समावेश त्यात होतो. बॉयलर चिकनच्या किंमतीत 16 टक्क्यांची घट झाली असल्यामुळे या थाळीच्या दरात घट झाली आहे. मे महिन्यात मांसाहारी थाळीच्या किंमतीतील घसरणीचे हेच प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. भाज्या, फळे, डाळींचे दर वाढल्यामुळे जूनमध्ये घाऊक अन्नधान्य महागाई चिंताजनक राहील. मिळालेल्या माहितीनुसार, अन्नधान्य चलनवाढीची दिशा ठरवण्यासाठी हवामान हा महत्त्वाचा घटक आहे. उष्णता वाढल्यामुळे (Price Hike) भाज्यांच्या किमती वाढू शकतात आणि महागाईच्या आकड्यावरही परिणाम होऊ शकतो. (Price Hike)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.