Raj Thackeray : कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरेंची माघार!

150
Raj Thackeray : कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरेंची माघार!
Raj Thackeray : कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरेंची माघार!

लोकसभा निवडणुकीनंतर कोकण पदवीधरची निवडणुकीची (Raj Thackeray) चुरस रंगात आली होती. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना बिनशर्त पाठींबा देत महायुतीच्या सभांमध्ये (Mahayuti) सहभागी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या (Konkan Graduate Constituency) निवडणुकीत पक्षाकडून अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांची उमेदवारी जाहीर करुन भाजपला धक्का दिला होता. त्यानंतर मनसे वि. भाजप असा सामना रंगणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. (Raj Thackeray)

राज ठाकरेंची मनधरणी करण्यात यश

अखेर राज ठाकरेंची मनधरणी करण्यात भाजपला यश आले असून कोकण पदवीधर निवडणुकीतून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) माघार घेतली आहे. भाजपने हालचाली करत राज ठाकरेंची मनधरणी करण्यासाठी निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड यांना राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर पाठवले. आज (७ मे) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. सकाळीच शिवतिर्थावर पोहचलेल्या प्रसाद लाड आणि निरंजन डावखरे यांना राज ठाकरेंची मनधरणी करण्यात यश मिळाले. त्यानंतर राज ठाकरेंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. (Raj Thackeray)

(हेही वाचा –Powai Bheemnagar : पवईत दगडफेकीप्रकरणी २००हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल; २५ जण ताब्यात, पोलिसांसह २५ जण जखमी)

भाजपकडून निरंजन डावखरे रिंगणात आहेत. डावखरे हे मागच्या दोन टर्मपासून कोकण पदवीधर मतदारसंघात आमदार आहेत. डावखरे यांच्यासाठी मनसेने माघार घेतली आहे. या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती. (Raj Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.