सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा शॉक; राज्यात नोव्हेंबर महिन्यात विजेच्या दरात वाढ होण्याची शक्यता

95

दूध, पेट्रोल, गॅसचे दर वाढल्यानंतर आता पुन्हा राज्यात वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे. विजेच्या इंधन समायोजन शुल्काच्या दरात पुन्हा एकदा ६० ते ७० पैसे प्रति युनिट म्हणजेच १५० ते २०० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा : गणेशोत्सवात श्रीफळाला मोठी मागणी)

इंधन शुल्कचे दर वाढणार?

राज्यात विजेच्या दरात १० ते २० टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आधीच घेतला आहे. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने १,५०० कोटी रुपये राखीव ठेवले होते. तो निधी २०२१ मध्येच संपला आहे. त्यामुळे महावितरणने १ एप्रिल २०२२ मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली. सध्या हे शुल्क १.३० रुपये प्रति युनिट इतके आहे. आता पुढील महिन्यात महावितरण ६० ते ७० पैशांची वाढ करणार आहे. त्यामुळे इंधन शुल्कचा दर हा दोन रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.

याबाबत महावितरणचे वाणिज्य संचालक डॉ. मुरहरी केळे यांनी सांगितले की, महानिर्मितीकडून वीज खरेदी दरात वाढ झाल्यामुळे इंधन समायोजन शुल्कावर त्याचे परिणाम झाले आहे, मात्र तूर्तास अशी ही दरवाढ होणार नाही, सध्याचे इंधन समायोजन शुल्क नोव्हेंबरपर्यंत लागू होणार आहे.

वीज कंपन्यांना फ्यूएल एडजस्टमेंट चार्ज (एफएसी) लावण्यास परवानगी

कोरोनाच्या काळात मागील दोन वर्षांमध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती. तसेच कोणतीही दर आकारण्यात आले नव्हते. मात्र त्यानंतर महाराष्ट्र वीज नियंत्रण मंडळाने १ जून २०२२ पासून वीज कंपन्यांना फ्यूएल एडजस्टमेंट चार्ज (एफएसी) लावण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील बेस्ट वीजच्या १०.५ लाख, ७ लाख टाटा पॉवर, २९ लाख अदानी इलेक्ट्रिसिटी आणि एमएसईडीसीएलच्या २.८ कोटी ग्राहकांना फटका बसणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.