Neelam Gorhe : राजकीय नेत्यांनी स्वामी गोविंद गिरी महाराजांकडून शिकावे

राज्य शासनामध्ये सुद्धा तुमचा काय दर्जा आहे याच्यानुसार ठरत असतं की, त्या प्रश्नांना काय महत्त्व आहे. खरं तर या पदांसाठी कॅबिनेट दर्जाच योग्य आहे परंतु दर्जा बरोबर त्या प्रश्नाचे महत्त्व हळूहळू मिळत गेलं हे अतिशय महत्त्वाच असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

205
यंदाची लोकसभेची निवडणूक म्हणजे विकास विरुद्ध द्वेष, Neelam Gorhe यांचा घणाघात

स्वामी गोविंद गिरी महाराजांचे अंतःकरण खूप विशाल आहे. राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडून कसे बोलायचे हे शिकण्यासारखे आहे. कोविड काळातील त्यांची प्रवचने नागरिकांमध्ये नव चैतन्य निर्माण करणारी ठरली. पूर्वीच्या संतांनी जे काम केले त्याचा समृद्ध वारसा स्वामी गोविंदगिरी महाराज चालवत आहेत, असे गौरवद्गार विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आळंदी येथे काढले. (Neelam Gorhe)

परमपूज्य गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आळंदी येथे आयोजित गीताभक्ती संमेलनात सहभागी झाले असता त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर पूज्यश्री शंकराचार्य महाराज, पुज्य श्री आनंदमूर्ती गुरु माँ, श्री पुष्पपेंद्र कुलश्रेष्टी, पूज्य श्री जितेंद्रनाथ जी महाराज, महंत डॉ राहुल बोधी जी, पदश्री दादा विधाते जी, भरत आनंद जी महाराज, स्वामी विजयेंद्र सरस्वती आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी प पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शाल व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी, त्यांनी आळंदी देवस्थान आणि परिसराचा आढावा घेतला. (Neelam Gorhe)

(हेही वाचा – Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीत भारतात असणार जगातील सर्वाधिक मतदार)

आमदार निधीतून दहा लाख रुपयाची मदत – डॉ. नीलम गोऱ्हे

उपसभापती गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या, आजवर स्त्रीच्या श्रमाचं घरगुतीकरण इतकं झालं होतं, त्याच्यामध्ये बाजारपेठ ही ठराविक समाजातल्या ठराविक हितसंबंधी लोकांची झाली होती. परंतु गेल्या वीस-पंचवीस वर्षांमध्ये काळ बदलला, जागतिकीकरण झालं त्यामुळे स्त्रियांना व्यवसायाच्या दृष्टीने बाजारपेठ उपलब्ध झाली. घरकामात ज्या वस्तू लागतात ते उत्पादन करणारी आपली इंडस्ट्री आहे हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने काम सुरू केलं तर सेवा क्षेत्र जेवढं मजबूत होईल तेवढंच स्त्रियांना रोजगारांमध्ये सहभागी होण हे सोपे होऊ शकेल. त्याच्यामुळे आपल्याला मनुष्यबळ विकासाला चालना मिळेल. त्या दृष्टिकोनातून या सगळ्या कामाला चालना मिळण्यासाठी महिलांची उत्पादन प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र किंवा अजून विविध प्रकारचे फक्त महिलांच्यासाठी रिसोर्स सेंटर करायचं असेल त्याच्यासाठी आमदार निधीतून दहा लाख रुपयाची मदत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी यावेळी जाहीर केली. (Neelam Gorhe)

महिला आर्थिक विकास महामंडळ आणि राज्य महिला आयोग दोघांनाही राज्यमंत्री पदाचा दर्जा हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मिळवून दिला असल्याचे डॉ. गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आवर्जून सांगितले. या दर्जामुळे अधिकारी आपल्याला सहकार्य देण्यासाठी प्रवृत्त होतात. त्यांना आपण काय म्हणतो हे ऐकावं लागतं. राज्य शासनामध्ये सुद्धा तुमचा काय दर्जा आहे याच्यानुसार ठरत असतं की, त्या प्रश्नांना काय महत्त्व आहे. खरं तर या पदांसाठी कॅबिनेट दर्जाच योग्य आहे परंतु दर्जा बरोबर त्या प्रश्नाचे महत्त्व हळूहळू मिळत गेलं हे अतिशय महत्त्वाच असल्याचे डॉ. गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी नुकताच अर्थसंकल्प मांडला आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत गटांना चालना देण्याचं काम गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये झालेलं दिसत आहे. (Neelam Gorhe)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.