PM Narendra Modi : जागतिक स्तरावर भारताविषयी अभूतपूर्व सकारात्मकता

गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी कमी झाली आणि व्यवसाय संस्कृती वाढली. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये व्यवसाय, विकास आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

150
Bharat Tex 2024 : जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवाचे थाटात आयोजन
Bharat Tex 2024 : जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवाचे थाटात आयोजन

सद्यस्थितीत सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचे मूल्यमापन केवळ गुंतवणुकीच्या आधारे केले जाऊ शकत नाही, तर हे प्रकल्प आपल्या उज्वल भविष्याचा समग्र आराखडा मांडणारे आणि म्हणूनच ते गुंतवणूकदारांसाठी आशेचा किरण ठरले आहेत. युएई आणि कतारला नुकतीच भेट दिली. या दौऱ्यातून आपल्याला जगभरात भारताप्रती असलेल्या अभूतपूर्व सकारात्मकतेचा अनुभव आला. आज जगभरातल्या प्रत्येक देशाला भारताची विकासगाथा आश्वासक आणि विश्वासार्ह वाटत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले.

(हेही वाचा – Deepak Kesarkar : विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी)

१० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचा प्रारंभ –

उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ‘विकसित भारत विकसित उत्तर प्रदेश’ कार्यक्रमाला त्यांनी (PM Narendra Modi) सोमवार १९ फेब्रुवारी रोजी संबोधित केले. उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद – 2023 च्या चौथ्या कार्यक्रमामध्ये राज्यासाठी १० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मंजूर झालेल्या १४००० प्रकल्पांचा प्रारंभ यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या प्रकल्पांमध्ये उत्पादन, अक्षय ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा, अन्न प्रक्रिया, गृहनिर्माण आणि मालमत्ता, आदरातिथ्य, मनोरंजन आणि शिक्षण यांच्यासह इतर क्षेत्रांमधील उद्योग व्यवसायांचा समावेश आहे.

उत्तम परिणामांची हमी असलेला देश –

सद्यस्थितीत देशभरात ‘मोदी की गॅरंटी’ची (मोदींची हमी) जोरदार चर्चा होत आहे आणि त्याचवेळी जगही भारताकडे ‘उत्तम परिणामांची हमी असलेला देश’ म्हणून पाहतो आहे, असे पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले. गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेल्या विश्वासाचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला. जगभरातील गुंतवणूकदारांचा आपल्या सरकारच्या धोरणांवर आणि सरकारच्या स्थैर्यावर विश्वास आहे, आणि उत्तर प्रदेशातही असाच कल दिसून येत असल्याचे मोदींनी नमूद केले.

(हेही वाचा – Rahul Gandhi आज सुलतानपूर न्यायालयात हजर होणार, जाणून घ्या काय आहे प्रकरण?)

या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की,

या कार्यक्रमाचे आयोजन म्हणजे, विकसित उत्तर प्रदेशच्या विकासाच्या माध्यमातून विकसित भारताच्या संकल्पाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. दूरदृश्य माध्यमाद्वारे उत्तर प्रदेशातील ४०० हून अधिक मतदारसंघातील लाखो लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते, हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्वांचे स्वागत केले आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिक आता या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात, याचा आनंद व्यक्त केला. अशा पद्धतीने इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहू शकतात, याची ७-८ वर्षांपूर्वी कल्पनाही कुणी केली नव्हती. उत्तर प्रदेशमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी होत असे, याकडे लक्ष वेधून पंतपधान मोदी म्हणाले, आता राज्यातील गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधींबाबत सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले आहे, त्याचे कौतुक वाटते. वाराणसीचे खासदार असल्यामुळे राज्याच्या प्रगतीबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. “आज उत्तर प्रदेश लाखो- कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचा साक्षीदार आहे”, असे ते म्हणाले. आजच्या विकास प्रकल्पांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, या प्रकल्पांमुळे उत्तर प्रदेशचा चेहरामोहरा बदलणार आहे. याबद्दल त्यांनी गुंतवणूकदारांचे तसेच तरुणांचे अभिनंदन केले. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Nissan X-Trail : निस्सान एक्सट्रेलची चौथ्या पिढीची एसयुव्ही भारतीय बाजारपेठेत नेमकी कधी अवतरणार?)

उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी कमी झाली आणि व्यवसाय संस्कृती वाढली –

उत्तर प्रदेशात सात वर्षांच्या डबल -इंजिन सरकारने केलेल्या कामांची दखल घेताना पंतप्रधान म्हणाले की, या काळात जागा ‘रेड टेप कल्चर’ची जागा ‘रेड कार्पेट कल्चर’ ने घेतली आहे. ते म्हणाले की, गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी कमी झाली आणि व्यवसाय संस्कृती वाढली. “गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये व्यवसाय, विकास आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे”, असे पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले. तसेच डबल इंजिनच्या सरकारने परिवर्तन घडवून आणण्याची मनापासून खरी इच्छा असेल तर, बदलाची अपरिहार्यता सिद्ध केली आहे, असेही ते म्हणाले. या काळात राज्यातून होणारी निर्यात दुपटीने वाढल्याचे त्यांनी नमूद केले. वीज निर्मिती आणि पारेषणात राज्याच्या प्रगतीचीही त्यांनी प्रशंसा केली. “आज, उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक द्रुतगती मार्ग आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले राज्य आहे. देशातील पहिली वेगवान रेल्वे जिथे धावते, ते उत्तर प्रदेश राज्य आहे,” असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी राज्यात पूर्व आणि पश्चिम परिघ द्रुतगती मार्गाने जोडलेल्या मोठ्या भागाकडे लक्ष वेधले. राज्यातील नदी जलमार्गाच्या होत असलेल्या वापराविषयी माहिती देऊन, पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील उत्तम संपर्क व्यवस्था यंत्रणा आणि प्रवास सुलभतेची प्रशंसा केली. (PM Narendra Modi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.