Rahul Gandhi आज सुलतानपूर न्यायालयात हजर होणार, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी सुलतानपूर येथील न्यायालयात हजर होणार आहेत. २०१८ च्या बदनामीच्या खटल्यासाठी ते हजर राहणार आहेत.

270
Rahul Gandhi आज सुलतानपूर न्यायालयात हजर होणार, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला असून ते मंगळवारी (20 फेब्रुवारी) सुलतानपूर न्यायालयात हजर होणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोमवारी (19 फेब्रुवारी) ही माहिती दिली. राहुल गांधी यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याला मंगळवारी (२० फेब्रुवारी) एका दिवसासाठी स्थगिती देण्यात आली आहे, कारण मानहानीच्या खटल्यात त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या समन्सवर उत्तर देण्यासाठी ते सुलतानपूरच्या दिवाणी न्यायालयात हजर होतील.

(हेही वाचा – NCP Crisis : 7 दिवसांत शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह द्या; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश)

राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल –

भाजप नेते विजय मिश्रा यांनी २०१८ मध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्यावर बंगळुरूमध्ये खुनी असल्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर विजय मिश्रा यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल करतांना विजय मिश्रा म्हणाले की; जेव्हा मी हे आरोप ऐकले तेव्हा मला खूप वाईट वाटले कारण मी ३३ वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहे. या प्रकरणात मी माझ्या वकिलाच्या माध्यमातून तक्रार दाखल केली आहे. ४ ऑगस्ट २०१८ रोजी सुलतानपूरच्या जिल्हा आणि सत्र खासदार/आमदार न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.

(हेही वाचा – Deepak Kesarkar : विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी)

दोषी आढळल्यास जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा –

विशेष म्हणजे, काँग्रेस खासदार राहुल गांधी दोषी आढळल्यास त्यांना जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे विजय मिश्रा यांच्या वकिलांनी म्हटले होते. (Rahul Gandhi)

(हेही वाचा – Manoj Jarange : सगेसोयऱ्यांना आरक्षण न दिल्यास पश्चातापाची प्रचिती येईल)

नेमकं प्रकरण काय ?

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोड़ो न्याय यात्रेत काही तासांचा विराम असेल. कारण, राहुल गांधी यांनी २०१८ मध्ये बंगळुरू येथे पत्रकार परिषदेत अमित शहांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. गुजरातमधील चकमकीच्या प्रकरणात त्यांनी अमित शहांवर हत्येचा आरोप केला होता. गांधींच्या वक्तव्याच्या चार वर्षांपूर्वी, मुंबईतील विशेष सी. बी. आय. न्यायालयाने 2005 च्या बनावट चकमक प्रकरणात शहा यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यावेळी शहा गुजरातचे गृहमंत्री होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.