PM Narendra Modi यांनी साजरा केला दीपोत्सव

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक आणि अलौकिक अशा या सोहळ्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमजीवींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

144
PM Narendra Modi यांनी साजरा केला दीपोत्सव

सोमवार २२ जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर संपूर्ण देशभरात दीपोत्सव साजरा केला गेला. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सोमवारी संध्याकाळी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी दीपोत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी श्रीरामांच्या फोटोसमोर दीप प्रज्वलन केले. मोदींनी या दीपोत्सवाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir Consecration : अयोध्येत राम मंदिराच्या निमित्ताने २२ टक्के नोकऱ्या वाढणार)

तब्बल ५०० वर्षांच्या प्रदीर्घ सामूहिक संघर्षानंतर सोमवार २२ जानेवारी रोजी रामलला (PM Narendra Modi) अयोध्येत विराजमान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. आजपासून म्हणजेच मंगळवार २३ जानेवारी पासून सर्वसामान्यांना रामललाचे दर्शन घेता येणार आहे.

(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir उत्तर प्रदेशाला बनवणार श्रीमंत; मंदिर व्हॅटिकन आणि मक्केलाही मागे टाकणार)

रामलल्लाच्या अभिषेकनंतर देशभरात विशेषत: अयोध्येत जल्लोषाचे वातावरण आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्या सर्वत्र दिव्यांनी उजळून निघाली. प्राणप्रतिष्ठेच्या आनंदात शरयू घाटावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. यासोबतच पंतप्रधानांनी देखील आपल्या निवासस्थानी दीपोत्सव साजरा करत “तमसो मां ज्योतिर्गमय”चा (अंधाराकडून प्रकाशाकडे चला) संदेश दिला. (PM Narendra Modi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.