PAN अपडेट केले नसेल, तर SBI अकाऊंट बंद होणार? सरकारने दिले स्पष्टीकरण

89

देशात अलिकडे कॅशलेस व्यवहार होऊ लागले आहेत. डिजिटलायझेशन वाढत असतानाच सायबर गुन्ह्यांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी मोबाईल, ई-मेलवर सुद्धा अशा अनेक लिंक्स आणि बातम्या येत असतात. परंतु अशा मेसेज, व्हायरल लिंकपासून आपण सावध राहणे गरजेचे असते. माहितीअभावी चुकीच्या लिंकवर क्लिक केल्याने आपले मोठे नुकसान होऊ शकते.

( हेही वाचा : Post Recruitment 2022 : भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी; परीक्षेविना होणार निवड, येथे करा अर्ज )

व्हायरल मेसेज मागचे सत्य 

सध्या अशाच पद्धतीचा मेसेज SBI बॅंकेच्या युजर्सला येत आहे. या मेसेजद्वारे पॅनकार्ड अपडेट करण्यास सांगण्यात येत आहे. तसेच पॅनकार्ड अपडेट केले नाहीतर तुमचे अकाऊंट ब्लॉक होईल असेही या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे. यावर आता सरकारने स्पष्टीकरण दिले असून पीआयबीने फॅक्ट चेकद्वारे ट्वीट केले आहे.

पीआयबीने दिले स्पष्टीकरण

लोकांना जागरूक करण्यासाठी सरकारडून पीआयबी फॅक्ट चेक हे ट्वीटर हॅंडल चालविले जाते. हे ट्विटर हॅंडल अशा व्हायरल मेसेजची आणि लिंक्सची सत्यता पडताळून सांगते. गेल्या काही दिवसांपासून लोकांना हे SBI च्या नावे मेसेज येत असल्याचे बोलले जात आहे. परंतु अशा प्रकारच्या ई -मेल आणि एसएमएसला कधीही उत्तर देऊ नये. बॅंक ग्राहकांकडे आपले पर्सनल डिटेल्स कधीही SMS द्वारे मागत नाही असे स्पष्टीकरण पीआयबी फॅक्ट चेकमार्फत देण्यात आले आहे.

जर तुम्हालाही एखाद्या व्हायरल मेसेजची सत्यता तपासायची असेल तर तुम्ही 91-879911259 किंवा [email protected] वर मेल करू शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.