Rehabilitation Housing Project : मुलुंडमध्ये भांडुप, विक्रोळी व घाटकोपरच्या लोकांना नाही स्थान

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन सदनिका प्रकल्प अंतर्गत मुलूंड (पूर्व) मध्ये बांधण्यात येणारी घरे ही मुलूंडमधील पायाभूत सुविधांवर ताण निर्माण करतील, असे चित्र निर्माण करत विरोध होत आहे.

1206
Rehabilitation Housing Project : मुलुंडमध्ये भांडुप, विक्रोळी व घाटकोपरच्या लोकांना नाही स्थान
Rehabilitation Housing Project : मुलुंडमध्ये भांडुप, विक्रोळी व घाटकोपरच्या लोकांना नाही स्थान
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन सदनिका प्रकल्प अंतर्गत मुलूंड (पूर्व) मध्ये बांधण्यात येणारी घरे ही मुलूंडमधील पायाभूत सुविधांवर ताण निर्माण करतील, असे चित्र निर्माण करत विरोध होत आहे. मात्र, या ठिकाणी भांडुप, विक्रोळी व घाटकोपर आदी भागातील प्रकल्प बाधितांचे या सदनिकांमध्ये पुनर्वसन केले जाणार आहे. परंतु अशा प्रकारचं वातावरण निर्माण करून एक प्रकारे या भागातील रहिवाशांनाच राजकीय  विरोध होत आहे, त्यांना एकप्रकारे मुलुंडमध्ये सामावून घेण्यास हा विरोध असल्याचे स्पष्ट होत आहे. (Rehabilitation Housing Project)
मुलूंडमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी सदनिका निर्मिती करताना त्यात आर्थिक घोटाळा असल्याचा आरोप करणाऱ्या तसेच याठिकाणी प्रकल्पग्रस्त आल्यानंतर त्यातून अस्थैर्य निर्माण होईल, अशा आशयाची भीती व्यक्त करणाऱ्या बातम्या प्रसारमाध्यमांतून तसेच समाज माध्यमांतून प्रसारित होत आहेत. या आरोपांचा मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्टपणे इन्कार केला आहे.  (Rehabilitation Housing Project)
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन सदनिका प्रकल्प अंतर्गत मुलूंड (पूर्व) मध्ये बांधण्यात येणारी घरे ही मुलूंडमधील पायाभूत सुविधांवर ताण निर्माण किंवा अस्थैर्य निर्माण करतील, ही भीती मुळात निराधार व अनाठायी आहे. याची कारणेच प्रशासनाने स्पष्ट केली आहेत. (Rehabilitation Housing Project)
सुमारे सात हजार घरे उपलब्ध होतील
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मुलूंडमधील पुनर्वसन घरे ही विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ च्या तरतुदीनुसार विनियम ३३(१०) चे कलम ३.११ अंतर्गत आणि परिमंडळ सहामधील गरजेनुसार बांधली जात आहेत. यातून सुमारे सात हजार घरे उपलब्ध होऊन, प्रति घर चार ते पाच सदस्य याप्रमाणे सुमारे २८ ते ३५ हजार रहिवासी येतील.  (Rehabilitation Housing Project)
खासगी प्रकल्पात सुमारे २० हजार रहिवासी आलेच असते..
हा भूखंड हा पुनर्वसन प्रकल्प घरांसाठी उपयोगात आणला नसता तरी, हा भूखंड विकासाधीन असल्याने त्यावर भूखंड मालकाने खासगी गृहनिर्माण प्रकल्प एरवीही उभारलाच असता. म्हणजेच, तेथे खासगी सदनिका तयार होऊन किमान १५ ते २० हजार रहिवासी आले असतेच. म्हणजेच पुनर्वसन सदनिकांमुळे मुलूंड परिसरात नागरी लोकसंख्येवर या प्रकल्पामुळे फार जास्त अतिरिक्त भार येत नाही. (Rehabilitation Housing Project)
घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलूंड भागातीलच बाधित रहिवासी…
मुलूंडमधील पुनर्वसन सदनिकांमध्ये येणारे रहिवासी हे बाहेरुन, अन्यत्र कोठून नव्हे तर प्रामुख्याने परिमंडळ सहामधील म्हणजेच घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलूंड भागामध्ये सुरु असणाऱ्या प्रकल्पांमुळे बाधित होणारे रहिवासीच असतील. याचाच अर्थ, मुलूंड येथील प्रकल्पामध्ये बांगलादेशी नागरिक येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जे प्रकल्प बाधित पदपथ, नाल्याच्या बाजूला झोपडपट्टी व तत्सम ठिकाणी राहत होते, त्यांना या पुनर्वसन सदनिकांमध्ये स्थानांतरीत केले जाणार आहे, एवढाच फरक आहे. म्हणजेच, त्याच आजुबाजूच्या परिसरातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिक चांगल्या दर्जाच्या सदनिकांमध्ये येणार आहेत. परिणामी, बाहेरुन येणाऱ्यांची स्थानिक लोकसंख्येमध्ये वाढ होईल, हे म्हणणे देखील पूर्णपणे अनाठायी ठरते. (Rehabilitation Housing Project)
बांगलादेशातून नागरिक तिथे येण्याचा प्रश्नच नाही!
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुलूंडमधील प्रकल्पामुळे पायाभूत सुविधांवर ताण येईल, हे म्हणणेही योग्य ठरत नाही. कारण पायाभूत सुविधा विकास हा विषय फक्त एखाद्या सदनिका प्रकल्प किंवा वसाहतीपुरता मर्यादीत नसतो. पायाभूत सुविधांची निर्मिती ही संपूर्ण मुंबईचा विचार करुन, विकास आराखडा तयार करुन, भविष्यातील लोकसंख्या, त्यांची गरज यांचा सारासार विचार करुन करण्यात येते. त्या नियोजनानुसार पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली जातात. मुलूंडमध्ये येणारे प्रकल्प बाधित हे परिमंडळ सहामधील घाटकोपर, मुलूंड, भांडूप, विक्रोळी येथील आजुबाजूच्या परिसरातीलच राहणारे आहेत, म्हणजेच ते बाहेरुन कोठून येणार नाहीत. त्यामुळे, बांगलादेशातून नागरिक तिथे येण्याचा प्रश्नच राहत नाही. (Rehabilitation Housing Project)
भीती  अनाठायी!
प्रकल्पबाधित आजही आजुबाजूलाच राहत असल्यामुळे, त्यांना आजही नागरी सेवा-सुविधा द्याव्याच लागत आहेत. परिणामी, पुनर्वसन सदनिकाधारकांसाठी वेगळ्या नागरी सेवा-सुविधा निर्माण कराव्या लागतील, ही भीती देखील अनाठायी आहे. (Rehabilitation Housing Project)
संपूर्ण जनतेला प्रकल्पांचा फायदाच…
उलटपक्षी, प्रकल्प बाधितांचे स्थलांतर झाल्याने त्यांची जीवनशैली उंचावणार आहे. झोपडपट्टी वा तत्सम वसाहतींमध्ये राहणारे नागरिक चांगल्या प्रकारचा निवारा प्राप्त करु शकतील. तसेच त्यांचे स्थलांतर वेगाने झाले तर या परिसरातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प देखील वेगाने मार्गी लागतील. त्यामुळे संपूर्ण जनतेला प्रकल्पांचा फायदाच पोहोचेल. याचाच अर्थ, एकूणच संपूर्ण परिसरातील नागरिकांचे जीवनमान व नागरी सेवा-सुविधांचा दर्जा वाढण्यास हातभार लागणार आहे. यामुळे मुलूंड पूर्वमधील नागरिकांच्या जीवनशैली व आरोग्यावर विपरित परिणाम होईल अथवा परिसरात अस्थैर्य निर्माण होईल, असे म्हणणे सर्वस्वी चुकीचे ठरते. (Rehabilitation Housing Project)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.