Paytm Crisis : पेटीएम यूपीआय सेवा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला विकल्याचा दावा पेटीएमने फेटाळला

पेटीएमची जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस बरोबर चर्चाही झाली नसल्याचं पेटीएमचे संस्थापक अध्यक्ष विजय शेखर यांनी म्हटलं आहे. 

157
Paytm Crisis : पेटीएम यूपीआय सेवा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला विकल्याचा दावा पेटीएमने फेटाळला
  • ऋजुता लुकतुके

पेटीएम (Paytm) पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानंतर पेटीएमच्या इतर सेवांबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. सोमवारी दोन महत्त्वाच्या बातम्या बाहेर पसरल्या. त्या म्हणजे पेटीएमची (Paytm) मनी लाँडरिंगसाठी चौकशी होणार आहे. आणि दुसरी म्हणजे पेटीएम (Paytm) वॉलेट सेवा विकण्यासाठी कंपनीची मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल कंपनीशी चर्चा सुरू आहे. या दोन्ही बातम्या अफवा असल्याचं पेटीएमने स्पष्ट केलं आहे. हिंदू वृत्तपत्राने पहिल्यांदा ही बातमी दिली होती. पेटीएम वॉलेट सेवेसाठी जिओ फायनान्शियल तसंच एचडीएफसी बँकेशीही पेटीएमची बोलणी सुरू असल्याचं बातमीत म्हटलं होतं. (Paytm Crisis)

पण, आता पेटीएम (Paytm) कंपनीतील सूत्रांनी ही बातमी खरी नसल्याचं म्हटलं आहे. पेटीएम कंपनीने यावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रियाही दिली नाही. उलट आयएनसी३२ या वेबपोर्टलशी बोलताना कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, ‘आम्ही कुठल्याही अफवेवर स्पष्टीकरण देऊ इच्छित नाही. नियामक मंडळाने आम्हाला दिलेल्या निर्देशांचं सध्या आम्ही पालन करत आहोत. आणि आमच्या ग्राहकांना सुरळीत सेवा देण्याचाच आमचा प्रयत्न आहे.’ (Paytm Crisis)

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली तिसऱ्या कसोटीत तरी खेळणार का यावर प्रश्नचिन्ह)

या सेवांसाठीच्या वॉलेटमध्येही मुदतीनंतर नवीन ठेवी स्वीकारण्यावर बंदी आहे

पण, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस बरोबरच्या कराराची शक्यता लक्षात घेऊन आता जिओचे समभाग शेअर बाजारात १३ टक्क्यांनी उसळले. तर हिंदू न्यूजलाईनने दिलेल्या बातमीत पेटीएमची (Paytm) जिओ फायनान्शियल बरोबर नोव्हेंबरपासून चर्चा सुरू होती, असं म्हटलंय. कंपनीचं मूल्यांकन चांगलं झालं तर पेटीएमची वॉलेट सेवा विकायची तयारी होती, असंही बातमीत म्हटलं आहे. या चर्चेविषयी माहिती असलेल्या सात अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हिंदूने ही बातमी केली होती. (Paytm Crisis)

पेटीएमचीच एक कंपनी असलेल्या पेटीएम (Paytm) पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेनं २९ जानेवारीला निर्बंध जारी केले. ‘नो युअर कस्टमर’ या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे मध्यवर्ती बँकेनं पेटीएम (Paytm) पेमेंट्स बँकेला २९ फेब्रुवारीनंतर नवीन मुदतठेवी स्वीकारायला बंदी घातली आहे. तर वॉलेट, फास्टटॅग अशा सेवांसाठीच्या वॉलेटमध्येही या मुदतीनंतर नवीन ठेवी स्वीकारण्यावर बंदी आहे. आणि रिझर्व्ह बँक मार्चमध्येच पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द करेल अशी शक्यता आहे. (Paytm Crisis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.