Virat Kohli : विराट कोहली तिसऱ्या कसोटीत तरी खेळणार का यावर प्रश्नचिन्ह

विराट कोहली सध्या परदेशात आहे. आणि तो भारतात तिसऱ्या कसोटीपूर्वी येणार का यावर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही मौन बाळगणंच पसंत केलं. 

131
IPL 2024 Virat Kohli : विराट कोहलीला कशाची भीती वाटते?
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली तेव्हा विराट कोहलीचा (Virat Kohli) संघात समावेश होता. पण, काही दिवसांनंतर वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहली पहिल्या दोन कसोटींतून माघार घेत असल्याचं बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलं. त्याच्या जागी निवड समितीने रजत पाटिदारची निवडही केली. आता तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोटला होणार आहे. पण, अजून विराटच्या सहभागावर बीसीसीआयने (BCCI) कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. (Virat Kohli)

विशाखापट्टणम कसोटीनंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मीडियाने हाच प्रश्न विचारला. ‘उर्वरित मालिकेसाठी विराट उपलब्ध आहे की नाही, याची मला माहिती नाही. पण, संघ निवडीपूर्वी निवड समितीचे सदस्य नक्कीच त्याच्याशी चर्चा करतील,’ असं मोघम उत्तर द्रविड यांनी दिलं. (Virat Kohli)

कोहलीने पहिल्या दोन कसोटींतून माघार घेताना वैयक्तिक कारण दिलं असलं तरी नेमकं कारण स्पष्ट केलं नव्हतं. त्यामुळेही उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. बीसीसीआयने (BCCI) तर पत्रक काढून मीडिया आणि चाहत्यांनी यावर अधिकची चर्चा करु नये असं म्हटलं होतं. काही दिवसांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील विराटचा मित्र एबी डिव्हिलिअर्सने विराट आणि पत्नी अनुष्का आपल्या दुसऱ्या बाळाची प्रतीक्षा करत असल्याचं सांगितलं. (Virat Kohli)

(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : शुभमन गिलची दुखापत किती गंभीर?)

कोहलीच्या भारतात परतण्यावर अजूनही स्पष्टता नाही

आणि यासाठी विराट सध्या भारताबाहेर असल्याचंही बोललं जात आहे. पण, तो तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतात परतणार का, यावर स्पष्टता नाही. बीसीसीआयनेही (BCCI) मालिके पूर्वीच विराटने संभाव्य रजेची कल्पना संघ प्रशासन, बीसीसीआय (BCCI) आणि कर्णधार रोहितला दिल्याचं स्पष्ट केलं होतं. (Virat Kohli)

विराट भारतासाठी शेवटची कसोटी खेळला तो दक्षिण आफ्रिकेत. या मालिकेत त्याने भारतासाठी सर्वाधिक १३४ धावा केल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-२० मालिकेत एका सामन्यात त्याने माघार घेतली होती. विराटच्या अनुपस्थितीत भारताने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. (Virat Kohli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.