Parliament Security Breach : ललित झा नाही तर ‘हा’ आहे खरा मास्टरमाईंड

२००१च्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्धापनदिनाच्या दिवशीच सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली. स्मोक कँडल जाळल्या, घोषणाबाजी केली. नंतर त्यांना पकडण्यात आलं.

160
Parliament Security : संसदेच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
Parliament Security : संसदेच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल

संसदेत बुधवार, १३ डिसेंबर रोजी झालेल्या घुसखोरी प्रकरणात (Parliament Security Breach) नवनवीन खुलासे उघडकीस येत आहेत. काही दिवसांपूर्वी या प्रकरणाचा मास्टरमाइंड ललित झा याला पोलिसांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र आता या सर्व प्रकारामागे ललित झा नसून कोणी दुसराच व्यक्ती असल्याचे समोर आले आहे.

अटक केलेल्या आरोपींची नार्को आणि पॉलीग्राफी टेस्ट – 

दिल्ली पोलिसांनी संसद घुसखोरी प्रकरणी (Parliament Security Breach) अटक केलेल्या आरोपींची नार्को (narco test) आणि पॉलीग्राफी टेस्ट केली. तसेच त्यांचे ब्रेन मॅपिंगही करण्यात आले. या सर्व टेस्टमधून एक नवीन खुलासा झाला आहे. या सर्व प्रकरणी ललित झा नसून कोणी दुसराच व्यक्ती असल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – Congress leader Karan Singh : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहण्यास संकोच नको’)

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद घुसखोरी प्रकरणाचा मास्टरमाईंड (mastermind) ललीत झा नसून ‘मनोरंजन डी’ आहे.

अहवालानुसार, पोलीस स्त्रोतांचा हवाला देत, नीलम आझाद वगळता इतर पाच आरोपींना डिसेंबर रोजी पॉलीग्राफ चाचणीसाठी गुजरातला नेण्यात आले होते. सागर आणि मनोरंजन यांच्या अतिरिक्त टेस्ट देखील झाल्या. मात्र निलमने न्यायालयासमोर चाचण्या करण्यास नकार दिला होता. (Parliament Security Breach)

सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, नीलम आझाद, ललित झा आणि महेश कुमावत या सर्व सहा जणांना शनिवारी (१३ जानेवारी) पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. (Parliament Security Breach)

(हेही वाचा – S Jaishankar जागतिक मुद्यांवर भारताची संमती महत्त्वाची)

आरोपीला ‘संदेश पाठवायचा होता’ – 

आतापर्यंतच्या तपासात आणि चौकशीत असे उघड झाले आहे की आरोपींनी सरकारला संदेश पाठवण्याची योजना आखली होती. आरोपींनी खुलासा केला आहे की ते बेरोजगारी, मणिपूर संकट आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांवर नाराज होते. नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचण्यांनी असे समोर आले आहे की मनोरंजन हा संसदेच्या उल्लंघनाच्या प्रकरणाचा सूत्रधार होता. (Parliament Security Breach)

संसदेवरील हल्ल्याच्या वर्धापनदिनाच्या दिवशीच घुसखोरी –

२००१च्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्धापनदिनाच्या दिवशीच (Parliament Security Breach) सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली. स्मोक कँडल जाळल्या, घोषणाबाजी केली. नंतर त्यांना पकडण्यात आलं. खासदार आणि सुरक्षा दलांनी त्यांना पकडलं तेव्हा अमोल आणि नीलम संसदेबाहेर घोषणाबाजी करत होते. अशा प्रकारे त्यांनी प्लॅन A यशस्वी केला. (Parliament Security Breach)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.