Drone Ban: पॅराग्लाईडर्स, पॅरा मोटर्स, मायक्रोलाईट एअर क्राफ्ट; ड्रोनच्या वापरावर १६ सप्टेंबरपर्यंत बंदी

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरिता बंदीचे आदेश

69
Drone Ban: पॅराग्लाईडर्स, पॅरा मोटर्स, मायक्रोलाईट एअर क्राफ्; ड्रोनच्या वापरावर १६ सप्टेंबरपर्यंत बंदी
Drone Ban: पॅराग्लाईडर्स, पॅरा मोटर्स, मायक्रोलाईट एअर क्राफ्; ड्रोनच्या वापरावर १६ सप्टेंबरपर्यंत बंदी

राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल्ड, मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हँण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलूनच्या उड्डाणक्रियांना बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 16 सप्टेंबर 2023 पर्यंत बंदी असल्याची माहिती पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरिता हे बंदीचे आदेश लागू आहेत. तथापि, ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे, अशांसाठी हा आदेश शिथिल असेल. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.