Warkari : आळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक

वारकरी मंदिर प्रवेश करण्यासाठी आग्रही होते. यामध्ये पोलिसांनी वारकऱ्यांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली.

137

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी वारी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून लाखो भाविकांचा महामेळा आळंदीत जमला आहे. रविवारी, ११ जून रोजी सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. यादरम्यान पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली.

वारकरी मंदिर प्रवेश करण्यासाठी आग्रही होते. यामध्ये पोलिसांनी वारकऱ्यांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वारकऱ्यांनी पोलीस बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांना आणि बॅरिकेट्सना लोटून देत मंदिर प्रवेशासाठी पुढे सरकले मात्र पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला आणि यावेळी पोलिस आणि वारकरी यांच्यात झटापट झाली. यानंतर थोड्या वेळात प्रकरण शांत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, मात्र हजारोच्या संख्येने असलेले वारकरी मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्याची माहिती मिळते आहे.

(हेही वाचा IND vs AUS WTC 2023 Final : इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाने फडकावला विजयाचा झेंडा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.