Eknath Shinde : महाराष्ट्र भवनासाठी श्रीनगरला जागा द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विनंती

श्रीनगर मधील हे महाराष्ट्र भवन केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृध्द कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल, असे शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे..

86

जम्मू आणि  काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  रविवारी जम्मू आणि काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांना प्रत्यक्ष भेटून केली. सध्या मुख्यमंत्री कश्मीर दौऱ्यावर असून येथे असून यावेळी त्यांनी सिन्हा यांची भेट घेतली जागेच्या मागणीचे पत्र दिले.

पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. श्रीनगर मधील हे महाराष्ट्र भवन केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृध्द कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल, असे शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.

जम्मू आणि कश्मीर समवेत नाते अधिक दृढ करण्यासाठी या  महाराष्ट्र भवनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल.  महाराष्ट्र भवनसाठी योग्य ती जागा मिळाल्यास कश्मीरची संस्कृती, पर्यावरण लक्षात घेऊन एक चांगले भवन या ठिकाणी राज्य सरकार तर्फे बांधण्याची  ग्वाही मुख्यमंत्र्यांनी पत्रात दिली आहे.

(हेही वाचा Hockey : हॉकीत भारताच्या महिला खेळाडूंनी रचला इतिहास; प्रथमच आशिया चषक जिंकला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.