Pakistan : महागाईने पाकिस्तानचे मोडले कंबरडे; खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्या

91
सध्या पाकिस्तानला (Pakistan) प्रचंड महागाईला सामोरे जावे लागत आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात देशाचा महागाईचा दर ४० टक्क्यांच्या वर कायम राहिला आहे. वाढत्या महागाईमुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत.

जीवनावश्यक वस्तू महागल्या 

पाकिस्तान (Pakistan) ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील महागाई दर ४१.१३ टक्के नोंदवला गेला. गेल्या वर्षभरात देशातील गॅसच्या (gas) किमती १,१०० रुपयांनी वाढल्या आहेत. पाकिस्तानमध्ये गॅसशिवाय खाद्यपदार्थांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. देशात पिठाच्या किंमतीत ८८.२ टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. याशिवाय बासमती तांदूळ (rice) ७६.६ टक्के, तांदूळ ६२.३ टक्के, चहाची पाने ५३ टक्के, लाल तिखट ८१.७० टक्के, गूळ ५०.८ टक्के आणि बटाटे (potato) ४७.९ टक्के महागले आहेत. गेल्या वर्षभरात देशात कांद्याचे दर ३६.२ टक्के, टोमॅटो १८.१ टक्के आणि वनस्पती तेलाचे भाव २.९० वाढले आहेत. मे २०२३ पासून पाकिस्तानातील (Pakistan) महागाई दरात सातत्याने घट होत आहे. ऑगस्टमध्ये तो दर २४.४० टक्क्यांपर्यंत घसरला होता. यानंतर पुन्हा एकदा महागाई दरात वाढ झाली असून १६ नोव्हेंबर रोजी तो ४० टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.