Pakistan Earthquake : पाकिस्तान हादरलं 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप; पाकला लष्करी हल्ल्यापूर्वीच निसर्गाचा ‘दे धक्का’ 

83

Pakistan Earthquake : भारता शेजारील देश पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के (Earthquake tremors) जाणवले आहेत. यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी नोंदवली गेली आहे. तसेच पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले गेले आहेत. त्यानंतर घाबरलेले लोक घरे सोडून रिकाम्या जागी पळू लागले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र १० किलोमीटर खोलीवर होते. हे भूकंपाचे धक्के खैबर-पख्तूनख्वा येथे जाणवले. (Pakistan Earthquake)

(हेही वाचा – Maulana Arrested: गुजरात एटीएसची मोठी कारवाई ! मदरशातून मौलानाला अटक; पाकिस्तान-अफगाणिस्तानशी दुवे)

आठवड्यात तिसऱ्यांदा पाकिस्तानला भूकंपाचा धक्का
३० एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी नोंदवली गेली. शनिवारी (३ मे २०२५) अफगाणिस्तानात ४.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता. एनसीएसच्या मते, भूकंप १५ किलोमीटर खोलीवर झाला. गेल्या एका आठवड्यात पाकिस्तानमध्ये तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले.

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : पाकिस्तानविरोधात रणनीती तयार?, पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत खलबतं)

गेल्या महिन्यात पाकिस्तानमध्येही भूकंप झाला होता
१२ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ इतकी होती. शनिवारी रात्री (स्थानिक वेळेनुसार) पश्चिम टेक्सासमध्ये ५.३ तीव्रतेचा भूकंप झाला. टेक्सासमधील मिडलँड आणि एल पासो या शहरांमधील व्हाईट्स सिटी, न्यू मेक्सिकोपासून सुमारे ३५ मैल दक्षिणेस हा भूकंप झाला. यूएसजीएसच्या मते, परिसरात लोकसंख्येचे प्रमाण कमी असल्याने भूकंपाचा लोकांवर मर्यादित परिणाम झाला.

(हेही वाचा – maharashtrian jewellery styles : जाणून घ्या महाराष्ट्रीयन दागिन्यांची का पडते महिलांना भुरळ? तुम्हाला यापैकी कोणते दागिने आवडतात?)

दरम्यान शुक्रवारी रात्री (२ मे २०२५) उत्तर गुजरातमध्ये ३.४ तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला. या भूकंपात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, असे जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्याचे केंद्र बनासकांठा जिल्ह्यातील वाव जवळ होते. गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (GSDMA) नुसार, गुजरात हा भूकंपाचा उच्च धोका असलेला क्षेत्र आहे आणि गेल्या २०० वर्षांत येथे नऊ मोठे भूकंप झाले आहेत.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.