Pahalgam Terror Attack : पहलगाममधील हल्ल्यानंतर श्रीनगरसाठीचे विमान तिकीट दर वाढवणाऱ्या विमान कंपन्यांना सरकारची चपराक

Pahalgam Terror Attack : काही पर्यटक अजूनही काश्मीरमध्ये अडकले आहेत.

118
Pahalgam Terror Attack : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांच्या केलेल्या हत्येचा निषेध
  • ऋजुता लुकतुके

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घाबरलेल्या पर्यटकांनी काश्मीर खोऱ्यातून मिळेल त्या मार्गांनी आपलं गाव गाठण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. श्रीनगर रेल्वे आणि विमानतळावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्याचवेळी देशावरील दहशवादी हल्ल्याच्या संकटात काही विमान कंपन्यांनी स्वत:ची संधी शोधत विमान तिकीटाचे दर तीन पटीने वाढवले आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी फोटो पोस्ट करून कमी तिकीटदर ठेवणाऱ्या विमान कंपन्याही लोकांना कशा लुबाडत आहेत, याचं चित्र उभं केलं आहे. श्रीनगरहून मुंबई आणि दुसरीकडे प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीटदर वाढविण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. (Pahalgam Terror Attack)

अखेर नागरी उड्डयण मंत्रालय आणि डीजीसीएला हस्तक्षेप करावा लागला. ज्या प्रवाशांनी पुढील तिकिटं रद्द केली आहेत, त्यांच्याकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क न आकारता लोकांना १०० टक्के रक्कम परत करण्याचे आदेश डीजीसीएने विमान कंपन्यांना दिले आहेत. तसंच विमान तिकिटांचे दरही नेहमीसारखे ठेवण्यासाठी बजावलं आहे. त्यानंतर मग विमान कंपन्यांनी आपले तिकिटांचे दर काहीसे आटोक्यात आणले आहेत. ‘हिंदुस्थान पोस्ट’ने गुरुवारी दुपारी ११ः४४ वाजता दर पाहिले असता मुंबई ते श्रीनगर एकेरी तिकीट ४८२० रुपयांना मिळत होतं. (Pahalgam Terror Attack)

(हेही वाचा – Chhattisgarh मध्ये सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांना घेरलं ; ५ नक्षलवादी ठार)

New Project 2025 04 24T144224.475

डीजीसीएने बुधवारी संध्याकाळी याविषयीच्या सूचना जारी केल्या. श्रीनगरहून देशभरात विमानांचे उड्डाण वाढविण्यात यावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, हजारो पर्यटक आणि भाविक अमरनाथ यात्रेसाठी काश्मीरला आले आहेत. मात्र, दहशतवादी हल्ल्यानंतर ते आपल्या घरी परतत आहेत. त्यामुळे, स्वस्त तिकीट दर आणि विमानांची संख्या वाढविण्याचे आदेश डीजीसीएने विमान कंपन्यांना दिले आहेत. (Pahalgam Terror Attack)

बुधवार सकाळपासून श्रीनगर ते भारतातील इतर ठिकाणांसाठीच्या विमान प्रवासाचे दर तब्बल २५,००० रुपयांपर्यंत पोहोचले होते. तब्बल तीन पट जास्त दराने हा प्रवास करावा लागत असून श्रीनगर ते मुंबई विमानाचे तिकीट ५६ हजार रुपयांपर्यंत वाढवल्याचे एका व्यक्तीने ट्विटरवर स्क्रीन शॉट टाकून म्हटलं होतं. इंटरनेटवर या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेणाऱ्या विमान कंपन्यांविरुद्ध कारवाईची मागणी होत आहे. (Pahalgam Terror Attack)

(हेही वाचा – Dharavi Development Project : धारावी विकास प्रकल्पासाठी देवनार डम्पिंगची ग्राऊंडची जागा, महापालिकेच्या तिजोरीवर पडणार २३०० कोटींचा भार)

दरम्यान, सरकारच्या आदेशानंतर एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीने श्रीनगरहून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या ४ अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यातील दोन विमाने ही दिल्लीसाठी असून दोन मुंबईसाठी वाढविण्यात आली आहेत. आपली सुट्टी मध्येच सोडून जे घरी परतू इच्छित आहेत, त्यांसाठी ही अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्यात आलीय. (Pahalgam Terror Attack)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.