Pahalgam Terror Attack: श्रीनगरहून 500 प्रवासी विशेष विमानाने राज्यात दाखल; ‘शिवशाही’ ही धावली मदतीला

194
Pahalgam Terror Attack: श्रीनगरहून 500 प्रवासी विशेष विमानाने राज्यात दाखल; ‘शिवशाही’ ही धावली मदतीला
Pahalgam Terror Attack: श्रीनगरहून 500 प्रवासी विशेष विमानाने राज्यात दाखल; ‘शिवशाही’ ही धावली मदतीला

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मधील पहलगाम येथे मंगळवारी २२ एप्रिलला दहशदवादी हल्ला झाला. यावेळी निष्पाप २६ जणांना बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानचे (India and Pakistan dispute) संबंध तनावग्रस्त झाले आहेत. तसेच या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या निर्देशानुसार, मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये दोन टप्यात विशेष विमानामधून (Special plane) ५०० पर्यटक परतले आहेत. (Pahalgam Terror Attack)

(हेही वाचा – ‘धार्मिक अधिकारांमध्ये हस्तक्षेप नाही…’ वक्फ कायद्यावर केंद्र सरकारने Supreme Court मध्ये प्रतिज्ञापत्र केले दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी २५ एप्रिलला २३२ पर्यटकांना घेऊन इंडिगो विमान श्रीनगरहून मुंबईत दाखल झाले आहे. यावेळी विमानतळावर भाजपा नेते व मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. दरम्यान, सुमारे ५०० पर्यटक आतापर्यंत महाराष्ट्रात परतले आहेत. गुरुवारी दोन विशेष विमानांनी १८४ पर्यटक मुंबईत पोहोचले होते.

पहलगाम हल्ल्यात २६ लोकांना आपला जीव गमवावा लागला. पुलवामा हल्ल्यानंतर हा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला (terrorist attack) असल्याचे बोलले जात आहे. अतिरेक्यांनी नाव आणि धर्म विचारून गोळ्या मारल्याचे बोलले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अतिरेक्यांनी केवळ पुरुषांनाच मारले आहे. घरातील मुख्य व्यक्तीच्या जाण्याने पीडित कुटुंबांवर दुःखाचे मोठे डोंगर कोसळले आहे.

(हेही वाचा – आता तरी Rahul Gandhi यांचं डोकं ताळ्यावर येईल; चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात)

शिवशाही धावली पर्यटकांच्या मदतीला
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर परिसरात राज्यातील विविध भागातील पर्यटक खोळंबले होते. त्यांना विशेष विमानानं सुखरूपपणे मुंबईत आणले. तसेच या प्रवाशांना मुंबईहुन पुढील प्रवासासाठी वातानुकूलित शिवनेरी पाठवण्याचे नियोजन एसटी महामंडळाने (SHIVSHAHI ST) केले आहे. पर्यटकांना धीर देण्यासह संपूर्ण वाहतूक व्यवस्थेच्या देखरेखीसाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक विमानतळावर उपस्थित होते. गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पर्यटकांचं विशेष विमान मुंबई विमानतळावर (टर्मिनल २) येथे दाखल झालं. मुंबईहुन त्यांच्या मूळ गावी जाणाऱ्या पर्यटकांसाठी ८ शिवनेरी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.