Deonar Slaughterhouse : देवनार पशुवधगृहाचा वीज पुरवठा रामभरोसे

सध्या या पशुवधगृहाला अदानी इलेक्ट्रिक कंपनीकडून उच्च दाबाचा विद्युत पुरवठा केला जातो.

448
Deonar Slaughterhouse : देवनार पशुवधगृहाचा वीज पुरवठा रामभरोसे
Deonar Slaughterhouse : देवनार पशुवधगृहाचा वीज पुरवठा रामभरोसे

देवनार पशुवधगृहाला विजेचा पुरवठा केल्या जाणाऱ्या दोन ट्रान्सफार्मर पैंकी एक ट्रान्सफार्मर बंद असून एकाच ट्रान्सफार्मरवर याचा सर्व भार असल्याने आता या पशुवधगृहात विजेचा लपंडाव सुरु होतो. त्यामुळे पशुवधगृहातील कामकाजावर परिणाम होत आहे. (Deonar Slaughterhouse)

मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वतीने देवनार पशुवधगृह अर्थात कत्तल खाना सन १९६८ मध्ये स्थापन करण्यात आला. या पशुवधगृहातील उपलब्ध सुविधांना विद्युत पुरवठा जुन्या वीज जोडणीसह ट्रान्सफार्मरच्या माध्यमातून केला जातो. ही यंत्रणा ५० वर्षे जुनी आहे. सध्या या पशुवधगृहाला अदानी इलेक्ट्रिक कंपनीकडून उच्च दाबाचा विद्युत पुरवठा केला जातो. परंतु सध्याची विद्युत प्रणाली ५० वर्षांहून अधिक जुनी असल्याने जुनी तथा कालबाह्य झाली आहे. तसेच तिची उपयुक्तता संपली आहे. (Deonar Slaughterhouse)

(हेही वाचा – IPL Auction 2024 : कमिन्सला मागे टाकून मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात महागडा खेळाडू)

उपयुक्त ठरेल असा ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नाही

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवनार पशुवधगृहाला विद्युत पुरवठा ०२ ट्रान्सफॉर्मरद्वारे पुरविला जातो. त्यापैकी एक कार्यरत असुन दुसरा आपत्कालीन स्थितीत आवश्यकता भासल्यास वापराकरिता आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत त्यातील एक ट्रान्सफॉर्मर गेल्या ५० वर्षांपासुन दीर्घ सेवा पुरवित असल्यामुळे त्याची उपयुक्तता संपुष्टात आली असुन पूर्णपणे बिघडलेल्या स्थितीत आहे. देवनार पशुवधगृहात सध्या एकच ट्रान्सफॉर्मर कार्यरत आहे. अन्य कोणताही आपत्कालीन स्थितीत आवश्यकता भासल्यास उपयुक्त ठरेल असा ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नाही. सतत चालु असलेला हा तेल आधारित ट्रान्सफॉर्मर ही जुना झाला आहे. (Deonar Slaughterhouse)

त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्युत पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे ही काळाची गरज आहे. अस्तित्वात असलेल्या १६०० केव्हीए ऑईल बेस्ड ट्रान्सफॉर्मर, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर (व्हीसीबी), बस बार. कमी दाबाचे पॅनेल, सुरक्षा उपकरणे, इन्सुलेशन मेंट, अर्थिग स्टेशन, एपीएफसी (ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोल पॅनेल), फायर अलार्म सिस्टम, आणि इलेक्ट्रिकल वायरिंग आदी बदल करणे आवश्यक आहे,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Deonar Slaughterhouse)

(हेही वाचा – Santa Cruz Chembur Junction : सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्यावरील ५ बांधकामांवर बुलडोझर)

काँक्रीट शेड बांधणे आवश्यक

सद्य स्थितीत असलेल्या ट्रान्सफॉर्मरचे शेड ही अतिशय जुनी झाली आहे. ती सध्या पडण्याच्या स्थितीत आले आहे. ही बाब अत्यंत धोकादायक असून त्यामुळे दोन्ही ट्रान्सफॉर्मर आणि कमी दाबाचे पॅनेल यांच्या स्थापनेकरिता व प्रणालीची देखभाल करणाऱ्या कामगारांकरिता काँक्रीट शेड बांधणे आवश्यक आहे. यासाठी यांत्रिक व विद्युत विभागाच्या माध्यमातून या विद्युत यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी नव्याने काम हाती घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. (Deonar Slaughterhouse)

यांत्रिक व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार देवनार पशुवधगृहासाठी दोन ट्रान्सफॉर्मरच्या जागी एकच ट्रान्सफॉर्मर उच्च क्षमतेचा बसवला जाणार आहे. यासाठी आवश्यक यंत्रणा नव्याने बसवली जाणार आहे. प्रस्तावित विद्युत व यांत्रिकी प्रणाली ही पर्यावरणपुरक असुन तिच्या परिरक्षणाचा खर्चही कमी आहे आणि ट्रान्सफॉर्मर आणि कमी दाबाचे पॅनेल यांचा देखभाल करणाऱ्या कामगारांच्या जीवातास धोका निर्माण होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. देवनार पशुवधगृह येथील विद्युत व यांत्रिकी प्रणालीच्या सुधारणेच्या कामांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये साई इलेक्ट्रीकल्स अँड इंजिनिअर्सची निवड करण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह १४ कोटी ७२ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. (Deonar Slaughterhouse)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.