Mumbai BJP : मुंबई भाजपातर्फे खास दिवाळी निमित्त ‘नमो उत्सव’

लालबाग गणेश गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, वांद्रे, गोरेगाव, विक्रोळी 'नमो उत्सवा'च्या रंगतदार मैफली

65
Mumbai BJP : मुंबई भाजपातर्फे खास दिवाळी निमित्त 'नमो उत्सव'
Mumbai BJP : मुंबई भाजपातर्फे खास दिवाळी निमित्त 'नमो उत्सव'

गणेशोत्सव, दहिहंडी, नवरात्र उत्सवाप्रमाणेच आता मुंबई भाजपातर्फे शहरासह उपनगरात नमो उत्सवांतर्गत दिवाळी पहाट आणि दिवाळी संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हा नमो उत्सव साकारला असून मान्यवर कलावंत, गीत, संगीत आणि सूरांच्या मैफलीत हा नमो उत्सव तब्बल ९ ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. नमो उत्सवात रविवारी (ता.१२) रोजी पहाटे ६ वाजता वांद्रे येथील रंगशारदा नाट्यगृहात प्रख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, संजीव चिम्मलगी यांची मैफल होणार आहे. या मैफलीचे निवेदन अमित काकडे तर संगीत संयोजन निरंजन लेले यांचे असणार आहेत. (Mumbai BJP)

शिवडी विधानसभा अंतर्गत नमो उत्सवात शुक्रवारी (ता.१०) रोजी सायं. ६.३० वाजता लालबाग येथील गणेश गल्ली मैदानावर दिवाळी संध्या कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात गायक उत्तरा केळकर, कविता राम, अभिषेक नलावडे, केतकी भावे, श्रीरंग भावे यांचे गीत सादरीकरण अमित काकडे यांचे निवेदन तर दिगंबर नाईक यांचा विशेष सहभाग असणार आहे. तर आ. मनीषाताई चौधरी यांच्या पुढाकारात नमो उत्सवात शनिवारी (ता.११) रोजी सायं. ६.३० वा. विद्या मंदीर शाळेचे सभागृह, छ. शिवाजी महाराज रोड, आनंद नगरच्या बाजूला, दहिसर येथे कार्यक्रम होणार आहे. गायक कलाकार दत्तात्रय मेस्त्री, सोनाली कर्णिक, राधिका नांदे, अभिषेक नलावडे, स्मिता गवाणकर यांचे गीत सादरीकरण तर संगीत संयोजन अमित गोठीवरेकर, दिपक कुमठेकर यांचे असणार आहे. (Mumbai BJP)

पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. १३) रोजी पहाटे ६ वाजता साहित्य संघ मंदिर गिरगाव चर्नी रोड येथे दिवाळी पहाट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये अभिनेता संकर्षण कराडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांचा विनोदी खुमासदार शैलीतील कार्यक्रम होणार आहे. तसेच गोरेगाव पूर्व येथे नागरी निवारा परिषद झोन १/२ सर्कल जवळ दिवाळी पहाट कार्यक्रम होईल. गायक कलाकार दत्तात्रय मेस्त्री, सोनाली कर्णिक, धनश्री देशपांडे, अभिषेक नलावडे यांचे सादरीकरण तर कुणाल रेगे यांचे निवेदन असणार आहे. विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर नं.२ येथील विकास हायस्कूल सभागृहात सायं. ६.३० वाजता दिवाळी संध्या कार्यक्रम होणार आहे. गायक कलाकार दत्तात्रय मेस्त्री, सोनाली कर्णिक, राधिका नांदे, अभिषेक नलावडे, स्मिता गवाणकर यांचे गीत सादरीकरण तर दिगंबर नाईक यांचा विशेष सहभाग असणार आहे. (Mumbai BJP)

(हेही वाचा – NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील वादावरील सुनावणी २० नोव्हेंबरपर्यंत स्थगित)

मुंबई भाजपा सचिव जितेंद्र राऊत, भाजपा माहीम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांच्या पुढाकाराने मंगळवारी (ता.१४) रोजी पहाटे ६ वाजता राजा बढे चौक शिवाजी पार्क दादर (पश्चिम) येथे दिवाळी पहाट कार्यक्रम होणार आहे. गायक दत्तात्रय मेस्त्री, सोनाली कर्णिक, धनश्री देशपांडे, संजीव चिम्मलगी, स्वरा जोशी यांचे गीत सादरीकरण, कुणाल रेगे यांचे निवेदन तर संगीत संयोजन अमित गोठीवरेकर, दिपक कुमठेकर यांचे असणार आहेत. जीवनगाणीचे प्रसाद महाडकर यांच्यातर्फे सर्व कार्यक्रमांचे संयोजन करण्यात आहे. हे सर्व कार्यक्रम मुंबईकरांना विनामुल्य आहेत. भाजपाच्या त्या त्या विभागात त्यांच्या मोफत प्रवेशिका उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. दिवाळीनिमित्त आयोजित या खास कार्यक्रमाना मुंबईतील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे. (Mumbai BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.