Operation Ajay : इस्रायलहून 230 भारतियांसह पहिले विमान रवाना होणार; काय म्हणाले परराष्ट्रमंत्री…

इस्रायलहून 230 भारतियांसह पहिले विमान आज रवाना होणार जे परतणार आहेत त्यांना कोणतेही भाडे दिले जाणार नाही आणि त्यांच्या परताव्याचा खर्च सरकार उचलत आहे.

112
Operation Ajay : इस्रायलहून 230 भारतियांसह पहिले विमान रवाना होणार; काय म्हणाले परराष्ट्रमंत्री...
Operation Ajay : इस्रायलहून 230 भारतियांसह पहिले विमान रवाना होणार; काय म्हणाले परराष्ट्रमंत्री...

इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतियांना घेऊन पहिले चार्टर विमान १२ ऑक्टोबरच्या रात्री बेन गुरियन विमानतळावरून रवाना होईल, असे सूत्रांनी सांगितले. (Operation Ajay) या विमानात इस्रायलमध्ये राहणाऱ्या सुमारे 230 भारतीयांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य “या तत्त्वावर नेण्यात भारतात आणण्यात येणार आहे. इस्रायलहून हे विमान रात्री 9 वाजता निघेल आणि त्यातील प्रवाशांकडून कोणतेही भाडे आकारले जाणार नाही, असे वृत्तसंस्थेने सांगितले. या प्रवाशांच्या प्रवासाचा पूर्ण खर्च सरकार उचलत आहे. 7 ऑक्टोबर रोजी एअर इंडियाने इस्रायलहून आपले उड्डाण तात्काळ स्थगित केल्यामुळे ज्यांना भारतात येता आले नाही, त्यांनाही पहिल्या विमानाने परतण्याची सुविधा दिली जाईल. (Operation Ajay)

(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर , नेमके कारण काय जाणुन घ्या)

हमासच्या दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतियांना वाचवण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी जाहीर केलेल्या ‘ऑपरेशन अजय’ चा भाग म्हणून भारतियांना परत आणले जात आहे. आज सकाळी जयशंकर यांनी इस्रायलहून निघणाऱ्या पहिल्या चार्टर विमानाच्या तयारीचा आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. (Operation Ajay)

यापूर्वी, त्यांनी दिल्लीत चोवीस तास नियंत्रण कक्ष आणि तेल अवीव आणि रामल्ला येथे परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ज्यांना मदतीची आवश्यकता असू शकते, अशा भारतियांना माहिती आणि सहाय्य पुरवण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन हेल्पलाईन स्थापन केली. एका ट्विटमध्ये इस्रायलमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, त्यांनी गुरुवारी विशेष उड्डाणासाठी नोंदणीकृत भारतीय नागरिकांच्या पहिल्या गटाला ईमेल केले. त्यानंतरच्या उड्डाणांसाठी इतर नोंदणीकृत लोकांना संदेश पाठवला जाईल, असे त्यात म्हटले आहे.

इस्रायलमध्ये 20,000 हून अधिक भारतीय रहातात, असे मुंबईतील इस्रायलचे महाव्यवस्थापक कोबी शोशानी यांनी सांगितले. शोशानी पुढे म्हणाले की, इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतियांची नेमकी संख्या त्यांना माहीत नाही. (Operation Ajay)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.