Onion Price : कांदा 5 हजार रुपये क्विंटल होताच निर्यात मूल्य 800 डॉलर

71
Onion Price : कांदा 5 हजार रुपये क्विंटल होताच निर्यात मूल्य 800 डॉलर

देशांतर्गत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने आशिया खंडातील कांद्याची (Onion Price) अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव सह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ होत घाऊक बाजारात कांदा पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर गेला आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने देशांतर्गत कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यात मूल्य डॉलर मध्ये वाढ केली आहे. त्यामुळे कांद्याचे निर्यात मूल्य प्रति मेट्रिक टन 800 डॉलर झाले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणी सापडणार आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यात शुल्क (Onion Price) वाढ करत 40 टक्के केले होते. त्यानंतर बाजार समित्या बंद ठेवून कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी या निर्णयाचा निषेध केला होता. आता कांदा निर्यात मूल्य दरामध्ये 800 डॉलर प्रति मॅट्रिक टन केल्याने कांदा उत्पादक शेतकरी या निर्णयाविरुद्ध काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागेल आहे.

(हेही वाचा – Mumbai concrete road : शहरातील सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामाला केली नाही सुरुवात, कंत्राटदाराला बजावली  नोटीस )

कांदा निर्यातदार प्रवीण कदम यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या (Onion Price) बाबत धर सोडीचे निर्णय घेत असल्याने कांद्याची जागतिक बाजारपेठ गमवण्याची कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांवर आली आहे तसेच परकीय चलन सुद्धा देशाचे बुडणार आहे या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसणार असल्याने केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी कांदा निर्यात धार व्यापारी करत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.