Onion Auction : लासलगावात कांदा लिलाव सुरू होणार

शेतकऱ्यांना बाजार समित्या खुल्या करून खरेदी-विक्री करण्याचे आवाहन

100
Onion Auction : लासलगावात कांदा लिलावाला सुरुवात
Onion Auction : लासलगावात कांदा लिलावाला सुरुवात

केंद्र सरकारच्या निर्यात शुल्काविरोधात कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद अखेर मागे घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उद्यापासून कांदा लिलाव सुरू होणार आहे. तरीही शेतकरी मात्र कांद्याला 2800 रुपये भाव देण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

केंद्र सरकार 2 लाख टन कांदा खरेदी करणार असून शेतकऱ्यांना 2 हजार 410 प्रतिक्विंटल भाव देणार असल्याची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी केली आहे. कांदा प्रश्नावर त्यांनी आज नाशिक येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत उद्यापासून कांद्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच शेतकऱ्यांना नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून 2 लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. 2 हजार 410 प्रतिक्विंटल भाव शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी या बैठकीत केली तसेच शेतकऱ्यांनी बाजार समित्या खुल्या करून खरेदी-विक्री करण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी केले.

(हेही वाचा – Mizoram disaster: मिझोराम बांधकाम सुरु असलेला पूल कोसळला ,अनेकजण ढिगाऱ्याखाली)

सोलापूरसह राज्यातील अनेक कृषी उत्पन बाजार समितीत कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे, मात्र कांद्याचा लिलाव बंद पाडण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आजल मार्केट यार्डाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.