Indapur School Bus  Accident : शैक्षणिक सहलीला जाणाऱ्या बसचा अपघात; एक शिक्षक ठार तर पाच ते सहा व विद्यार्थी जखमी

इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालय शैक्षणिक सहलीच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

543
Indapur School Bus  Accident : शैक्षणिक सहलीला जाणाऱ्या बसचा अपघात; एक शिक्षक ठार तर पाच ते सहा व विद्यार्थी जखमी
Indapur School Bus  Accident : शैक्षणिक सहलीला जाणाऱ्या बसचा अपघात; एक शिक्षक ठार तर पाच ते सहा व विद्यार्थी जखमी

इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या बसच्या परतीच्या मार्गावर सोलापूर जिल्ह्यातील वटपळी येथे अपघात (Accident) झाल्याची घटना गुरुवारी ( २१ डिसेंबर) घडली. प्राथमिक मिळालेल्या  माहितीनुसार एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून शिक्षक व पाच ते सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अकलुज येथील रुग्णालायत उपचार सुरू आहेत. (Indapur School Bus  Accident)

(हेही वाचा : Mumbai : ती चौदाव्या मजल्यावरून पडली आणि …कुटुंबियांच्या काळजात झाले धस्स)

तर याबाबत मिळालेल्या माहितीनुसार १९ डिसेंबर रोजी गणपती पुळे येथे गेली होती. त्यानंतर गुरुवारी (२१ डिसेंबर) रोजी पहाटे परतत असताना माळशिरस तालुक्यातील पाटील वस्ती लगत सहलीची एस.टी बस व टेम्पो यांची धडक झाली. (Indapur School Bus  Accident)

.या बस मध्ये चालक, २ पुरुष , २ महिला असे एकूण ४ शिक्षक व ४० विद्यार्थी होते. ही धडक इतकी जोरदार होती की या अपघातात  एक शिक्षक जागीच ठार झाले तर अन्य शिक्षक व विद्यार्थी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर या एसटीचा पुढील भाग संपूर्ण चेपला गेला आहे. (Indapur School Bus  Accident)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.