500 आणि 1000 च्या जु्न्या नोटा पुन्हा बदलता येणार, काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

120

नोव्हेंबर 2016 मध्ये केंद्र सरकारने नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या. त्यावेळी ठरिवाक मुदतीत जुन्या नोटा बदलून घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. पण ज्यांनी या मुदतीत जुन्या नोटा बदलल्या नाहीत त्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल अत्यंत महत्वाचा आहे.

(हेही वाचाः IND vs NZ: भारताविरुद्धच्या विजयानंतर न्यूझीलंडने घेतली झेप, 2023 वर्ल्ड कपच्या सुपर लीगमध्ये मोठा बदल)

दिलेल्या मुदतीत ज्या व्यक्तींनी जुन्या नोटा बदलल्या नसतील अशा लोकांनी आरबीआयकडे केलेल्या अर्जांचा विचार करावा, असा निर्णय नोटाबंदीला आव्हान देणा-या याचिकांच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयाची सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एस.अब्दुल नजीर, बी.आर. गवई,ए.एस. बोपण्णा,व्ही. रामसुब्रमण्यम आणि बी.व्ही.नगररत्न या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाच्या वैधतेचा विचार होत आहे. नोटा बदलण्याच्या तारखा वाढवता येणार नाहीत, असे भारताचे अॅटर्नी जनरल आर व्यंकटरामानी यांनी म्हटले होते. पण ज्या अर्जदारांनी आवश्यक त्या अटींची पूर्तता केली असेल अशा विनाहरकत अर्जांचा रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने विचार करावा,असे न्यायालयाने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.